शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

‘लोकमत’चे आयकॉन्स हेच खरे ‘सिंघम’

By admin | Published: November 21, 2014 1:23 AM

अजय देवगण यांचे गौरवोद्गार : कोल्हापूर येथील शानदार सोहळ्यात ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे प्रकाशन

कोल्हापूर : शून्यातून सुरुवात करत समाजाप्रती कृतज्ञता ठेवून काम करत असलेले ‘लोकमत’चे दक्षिण आयकॉन्स हेच खरे ‘सिंघम’ आहेत, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांनी काढले. दक्षिण महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांचा जीवनपट रेखाटणाऱ्या ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर येथे रंगलेल्या या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यास महापौर तृप्ती माळवी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उद्योगपती संजय घोडावत, बीग ड्रीमचे संचालक संजय कुंभार आणि ‘लोकमत’ मीडिया ग्रुपचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. ‘लोकमत’ कोल्हापूरच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्यास कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित होते. देवगण म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये खूप आदर्शवादी काम करत असतो. मी चित्रपटातील बाजीराव सिंघम असलो तरी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल बुकमधील आयकॉन्स हेच खरे सिंघम आहेत. चित्रपटातील भूमिकांबाबत प्रेक्षक आमची वाहवा करतात, पण शून्यातून सुरुवात करत समाजाप्रती कृतज्ञता ठेवून काम करणाऱ्या या आयकॉन्सबाबत समाजाने कृतज्ञ राहायला हवे. त्यांना समाजासमोर आणून ‘लोकमत’ने मोठे काम केले आहे. खासदार दर्डा म्हणाले, ‘लोकमत’च्या दक्षिण महाराष्ट्र कॉफी टेबल बुकमधील आयकॉन्सनी महाराष्ट्राला समृद्ध केले. सर्वसामान्यांचे जीवनमान बदलले आणि नव्या पिढीत विश्वास जागविला आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही समाजासमोर आणला आहे. त्यातून नव्या पिढीला दिशा मिळेल, असा विश्वास आहे. प्रास्तविकात कॉफी टेबल बुकमागील संकल्पना मांडताना ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, ‘यातील आयकॉन्स म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनपट आहे’. या बुकमधील ५१ व्यक्तिमत्त्वे म्हणजे ‘रत्ने’च म्हणावी लागतील असे त्यांचे जग आहे.मान्यवरांची उपस्थितीश्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर तृप्ती माळवी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, निवृत्त पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव, मेनन उद्योग समूहाचे सचिन मेनन, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक भोईटे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, बॅँक आॅफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापक राजमणी गणेशन, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी महापौर सई खराडे, नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, शाहू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरुपा यड्रावकर, वीरेंद्र संजय मंडलिक, गार्डियन हॉलिडेजचे कृष्णात दिवटे, परेश हातकर, टिंबर मार्केट असोसिएशनचे सचिव हरिभाई पटेल, ‘टिंबर मार्केट लघुउद्योग’चे अध्यक्ष वसंतराव देशमुख, रमेश लालवाणी, महाभारत कन्स्ट्रक्शनचे जयेश कदम, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, फायनान्स आॅफिसर शाम कोले, शिवदत्त असोसिएटस्चे अजय डोईजड, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, वारणा दूध संघाचे सचिव के. एम. वाले, जे. जे. मगदूम इंजि.चे जनसंपर्क अधिकारी एस. आर. यादव, सायरस पुनावाला स्कूल पेठवडगावचे प्राचार्य सरदार जाधव, गडहिंग्लजच्या रवळनाथ हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष अनिल चौगुले, युनिक आॅटोचे सुधर्म वाझे, अ‍ॅड एजन्सीज- ‘आस्मा’चे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे संचालक डॉ. के. रवी, फायर इंजिनिअरिंग कॉलेजचे युवराज पाटील, किरण पाटील, चाटे क्लासेसचे भारत खोराटे, द्वारकादास शामकुमारचे जुगलभाई बुब, जाधव इंडस्ट्रीजचे चंद्रकांत जाधव, सिद्धिविनायक कम्युनिकेशनचे सत्यजीत जाधव, शिवगंगा ट्रेडर्सचे सुरेश काशीद, रॉयल ब्ल्यूचे मनोज कोळेकर, उद्योगपती हरिष बोहरा, आंबुबाई पाटील स्कूलचे के. डी. पाटील, ‘आसमा’चे अध्यक्ष व संपर्क अ‍ॅड एजन्सीचे मोहन कुलकर्णी, मल्टिप्रिंटचे कौस्तुभ नाबर, जयेंद्र पब्लिसिटीचे प्रशांत कुलकर्णी, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, पॅन्थर पब्लिसिटीचे शरद पाटील, क्लायमॅक्स अ‍ॅड एजन्सीचे उदय जोशी, इंटरट्रेड अ‍ॅड एजन्सीचे सलीम देवळे, अस्लम देवळे, अभय पब्लिसिटीचे अभय मिराशी, झेड क्रिएशनचे लियाकत नाईक, इंप्रिशन पब्लिसिटीचे सुनील बनगे, सातारा जिल्ह्यातील हणमंतराव चव्हाण, सौ. राजश्री चव्हाण, डॉ. अनिरुद्ध जगताप, सलीम कच्छी, डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. नेहा दांडेकर, दिलीपभाई दोशी, प्रसाद दोशी, नदीम शेख, सौ. रुबीना शेख, चंद्रशेखर चोरगे, संकेत चोरगे, अभिजीत पिसाळ, विपुल शहा, नितीन बनवणे, जयंत गुजर, डॉ. सौ. जयश्री सुरेश शिंदे, फत्तेसिंग सरनोबत, एन. व्ही. देशपांडे, गुरुप्रसाद नाईक, आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.विमानतळावर उत्साही स्वागततत्पूर्वी, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व खासदार विजय दर्डा व अभिनेते अजय देवगण यांचे बुधवारी सकाळी विमानतळावर उत्साहात स्वागत झाले. उजळाईवाडी विमानतळावर सकाळी नऊच्या सुमारास विमानाने खासदार विजय दर्डा व अजय देवगण यांचे आगमन झाले. महापौर तृप्ती माळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, ऋतुराज संजय पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, कॉँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, ‘लोकमत’ कोल्हापूरचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मनुष्यबळ व प्रशासनचे व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’ सखी मंचच्या महिला सदस्यांनी खा. दर्डा आणि देवगण यांचे औक्षण केले. कोल्हापुरात ‘लोकमत’च नंबर १‘लोकमत’ आता कोल्हापूर शहरातही प्रथम क्रमांकाचे दैनिक झाले आहे, हे सांगताना मला आनंद वाटतो आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत आणि प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या मान्यवरांना ‘आयकॉन आॅफ दक्षिण महाराष्ट्र’ या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून पुढे आणले. ‘लोकमत’ केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरतीच मर्यादित पत्रकारिता करीत नाही, तर या प्रदेशातील मातीशी एकरूप झाला आहे. येथील जनतेच्या सुखदु:खाचा तो भागीदार बनला आहे़ त्यामुळेच आयकॉन्स या कॉफीटेबल बुकमधून समाजातील कर्तृत्वानांचे कार्य लोकमत तर्फे पुढे आणले जात आहे़- खासदार विजय दर्डापोवाड्याने संचारला उत्साहअजय देवगण, विजय दर्डा यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन होताच ‘विटी दांडू’ या चित्रपटातील उदेश उमप यांनी गायिलेल्या पोवाड्याने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. ‘लोकमत’च्यावतीने महालक्ष्मीची प्रतिमा देऊन विजय दर्डा यांनी अजय देवगण यांचा सत्कार केला. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी ‘विटी दांडू’चे दिग्दर्शक विकास कदम यांचा सत्कार केला. तुतारींच्या निनादात मान्यवरांचे स्वागतकार्यक्रमाची वेळ सकाळी साडेदहा वाजता होती; पण पावणेदहा वाजल्यापासूनच ‘आयकॉन्स’ व त्यांचे कुटुंबीयांचे आगमन होत होते. त्यांचे ‘लोकमत’च्या प्रवेशद्वारातच तुतारीच्या निनादात स्वागत झाले. यामुळे उत्साह संचारला. दक्षिण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा समावेश असणारे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, अभिनेते अजय देवगण, लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, उद्योगपती संजय घोडावत, ‘बीग ड्रीम’चे संचालक संजय कुंभार व महापौर तृप्ती माळवी. ‘लोकमत’ तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’मधील समाविष्ठ मान्यवरांसोबत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, लोकमत’मिडीया ग्रुपचे चेअरमन खासदार विजय दर्डा, अभिनेता अजय देवगण. आयकॉन्स आॅफ साऊ थ महाराष्ट्रश्री शाहू छत्रपती महाराज प्रेसिडेंट, आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी,डॉ. डी. वाय. पाटीलराज्यपाल बिहार,कल्लाप्पाण्णा आवाडेमाजी खासदार, अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन को-आॅप.फॅक्टरीज लि. नवी दिल्ली.,जी. एल. ऐनापुरे,माजी आमदार,संजय भोकरेअध्यक्ष, अंबाबाई तालीम शिक्षण संस्था, मिरज.,डॉ. अतुल भोसलेअध्यक्ष, कृष्णा सहकारी बँक लि.,रेठरे बुद्रुकडॉ. सुरेश भोसलेकुलगुरु, कृष्णा अभिमत विद्यापीठकांतीलाल चोरडियाचेअरमन, युनिक ग्रुप, कोल्हापूर,एस.एफ. चौगुलेचेअरमन, एस.एफ.सी.इन्फ्राकॉन प्रा.लि.,फरोख कूपरअध्यक्ष, कूपर इंडस्ट्रीज, सातारा,व्ही. एन. देशपांडेचेअरमन, साऊंड कास्टिंग्ज प्रायव्हेट लि., कोल्हापूर,अनिलकुमार, विजयकुमार आणि रविकुमार धामेजासंचालक, पूजा फुटवेअर, तासगाव,डॉ. किरण दोशीचेअरमन, कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ आॅर्थोपेडिक अँड ट्रामा (केआयओटी),अभय व जितेंद्र गांधीसंचालक, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी इस्पात प्रा. लि., कोल्हापूर,ललित गांधीनॅशनल प्रेसिडेंट, आॅल इंडिया मारवाडी युवा मंच, कोल्हापूर,दिलीप घाटगेसिनीअर पार्टनर, एस. एम. घाटगे अँड सन्स (आॅटो), कोल्हापूर,सतीश घाटगेमॅनेजिंग डायरेक्टर, घाटगे ग्रुप, कोल्हापूर,संजय घोडावतचेअरमन, संजय घोडावत ग्रुप, जयसिंगपूर,बापू जाधवचेअरमन, सरोज ग्रुप आॅफ कंपनीज, कोल्हापूर,दिलीपराव जाधवचेअरमन, पॉप्युलर स्टील वर्क्स अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरल इंम्प्लिमेंटस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर,बाबूराव जोगउपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफ व सुवर्णकार फेडरेशन, सांगली,अमोल कोरगांवकरअध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन, कोल्हापूर,प्रवीण लुंकडग्रुप हेड, प्रणव ग्रुप पुणे, सांगली,डॉ. अनिल मडकेडायरेक्टर, श्वास हेल्थकेअर प्रा. लि. सांगली. ,विजयराज मगदूमचेअरमन, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूर,नसीम महातअध्यक्ष, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन (महिला आघाडी), सांगलीरमाकांत मालूमॅनेजिंग डायरेक्टर, समृद्धी इंडस्ट्रिज लि. सांगली.सदाशिवराव मंडलिकज्येष्ठ नेते, माजी खासदार, कोल्हापूरपुरुषोत्तम मंत्रीचेअरमन अँड मँनेजिंग डायरेक्टर, मंत्री मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूरराम मेननचेअरमन, मेनन ग्रुप आॅफ कंपनीज, कोल्हापूरविजय मेननमॅनेजिंग डायरेक्टर, मेनन अ‍ॅन्ड मेनन लिमिटेड, कोल्हापूरआमदार हसन मुश्रीफमाजी मंत्री, कागल.भरत ओसवालचेअरमन, महेंद्र ज्वेलर्स, कोल्हापूरपारस ओसवालचेअरमन अ‍ॅण्ड मँनेजिंग डायरेक्टर, पूजा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, कोल्हापूरकृषिभूषण डॉ. संजय डी. पाटीलअध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, कोल्हापूर,सुरेश पाटीलमाजी महापौर आणि चेअरमन, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली,राजेंद्र पाटील-यड्रावकरअध्यक्ष, यड्रावकर उद्योग समूह, जयसिंगपूर,डॉ. सूरज पवारकॅन्सर सर्जन व मॅनेजिंग डायरेक्टर, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर,,सौ. विद्या पोळअध्यक्षा, मिसेस विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगांव, जि. कोल्हापूर,डॉ. संतोष प्रभूचेअरमन अँड डायरेक्टर, न्युरो सर्जिकल सर्व्हिसेस, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरो सायन्सेस, कोल्हापूर,डॉ. अशोक पुरोहितसंचालक, पुरोहित हॉस्पिटल, सांगली.,प्रकाश राठोडचेअरमन अ‍ॅन्ड मॅनेजिंग डायरेक्टर, कॅस्प्रो ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, कोल्हापूर,बिपीन शहासी.ई.ओ. हेम ग्रुप, कोल्हापूर,अतुल शहाराज्याध्यक्ष, व्यापारी महासंघ, सांगली,डॉ. सुरेश शिंदेचेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, सातारा हॉस्पिटल, सातारा,आर. व्ही. ऊ र्फ राजाभाऊ शिरगावकरचेअरमन अ‍ॅन्ड मेन्टार, शिरगावकर ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, कोल्हापूर-सांगली,अस्लम तांबोळीडायरेक्टर, हिरा फ्लोअर मिल, साताराइब्राहीम तांबोळी,मॅनेजिंग डायरेक्टर, हिरा फ्लोअर मिल, सातारा,बाबाभाई व हसमुखभाई वसामॅनेजिंग डायरेक्टर, जॉईट मॅनेजिंग डायरेक्टर, रॉकेट इंजिनिअरिंग कॉपोरेशन प्रा. लि., कोल्हापूर,विजयसिंह यादवअध्यक्ष, श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ, पेठवडगाव,रामप्रताप झंवरचेअरमन, झंवर ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, कोल्हापूर.