शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

लोकमतचा ऐतिहासिक संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:27 PM

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 19 - दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला-वहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद ...

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला-वहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.  लोकमत वृत्तपत्र समूह यापुढे दरवर्षी संसदीय पुरस्कार देणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श सदस्यांचा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकमत संसदीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन.के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांचा सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना देण्यात आला, तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला.

पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा-  युट्यूब,  फेसबुक , ट्विटर

 

https://www.dailymotion.com/video/x8458qt

लोकमतच्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती अन्सारींव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी नगरविकासमंत्री व उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जया बच्चन यांनीही उपस्थिती दर्शवली.  

 
या ज्युरींनी केली निवड-
देशातील मान्यवर नेते, संसदेचे माजी सचिव व पत्रकारांच्या स्वतंत्र ज्युरी मंडळाला पुरस्कारयोग्य संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी लोकमतने सोपवली होती. सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर ज्युरींनी ८ संसद सदस्यांची निवड केली. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळामध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, शरद यादव, माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.
( लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी लोकमतचे एडिटोरियल इन चिफ राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली)
(लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला जया बच्चन यांची उपस्थिती)
(लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडूंची उपस्थिती)
(लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान फारुख अब्दुल्ला आणि शरद पवारांची गळाभेट)