शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी अन् TMC चे युसुफ पठाण रंगणार सामना; कुणाचं पारडं जड?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:02 AM

Berhampore Lok Sabha Seat West Bengal: बहरामपूर लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील सहा जागांवर मागील निवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला तर एका जागेवर भाजपा जिंकली. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या मतदारसंघात काँग्रेस खातेही उघडू शकले नाही.

TMC vs Congress in Loksabha Election ( Marathi News ) पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व ४२ उमेदवारांच्या नावाची घोषणा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं केली आहे. या यादीत मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर जागेवरून माजी क्रिकेटर युसुफ पठाण याला टीएमसीने मैदानात उतरवलं आहे. २००७ च्या टी २० आणि २०११ च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचा भाग असलेल्या युसुफ पठाण हा मूळचा गुजरातचा आहे. टीएमसीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात युसुफ पठाणला उभं केले आहे. त्यामागे काय रणनीती आहे? हे समजून घेण्यासाठी निवडणुकीचे निकाल आणि मतांचे गणित जाणून घ्यावे लागेल.

बहरामपूरची जागा कधीही TMC नं जिंकली नाही

बहरामपूर लोकसभा जागेचा इतिहास पाहिला तर १९५२ ते १९८० पर्यंत याठिकाणी रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे त्रिदीब चौधरी हे सातत्याने ७ वेळा निवडून आले. १९८४ मध्ये अतिशचंद्र सिन्हा यांच्या रुपाने या जागेवर पहिला काँग्रेस खासदार निवडून आला. त्यानंतर आरएसपी पुन्हा परतले आणि १९९८ पर्यंत नानी भट्टाचार्य आणि प्रमोथ्य मुखर्जी पक्षाच्या तिकीटावर लोकसभेला पोहचले. १९९९ मध्ये अधीर रंजन चौधरी या मतदारसंघातून पहिल्या निवडून आले. तेव्हापासून आजतागायत ते सलग ५ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बहारमपूर जागा अशी आहे जी सुरुवातीपासून आजपर्यंत कधीही तृणमूल काँग्रेसला जिंकता आली नाही. 

अधीर रंजन यांना हरवणं, ममतांसाठी गरजेचे

बहारमपूर जागेवर टीएमसीने २०१९ च्या निवडणुकीच्या पूर्वीपासून लक्ष केंद्रित केले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत अधीर रंजन चौधरी यांना हरवणे ममतांसाठी गरजेचे बनले आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात अधीर रंजन चौधरी हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. ममता बॅनर्जींविरोधात कडवट विरोध अधीर रंजन चौधरी करतात. इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी असूनही अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत ममता बॅनर्जींचे कधीही जुळाले नाही. टीएमसी आणि काँग्रेस वेगवेगळ्या लढण्यामागे अधीर रंजन चौधरीच असल्याचा दावा टीएमसी नेते करतात. 

टीएमसीने बहरामपूर जागेची जबाबदारी मागील निवडणुकीच्या आधी शुभेंद्रु अधिकारी यांना सोपवली होती जे सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. शुभेंद्रु कधी टीएमसीतील चाणक्य मानले जायचे. टीएमसीने २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये आमदार असलेल्या अपूर्वा सरकार यांना मैदानात उतरवलं होते. त्या निवडणुकीत २०१४ ला जवळपास साडे तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवणाऱ्या अधीर रंजन चौधरींचं मताधिक्य कमी होऊन केवळ ९० हजार राहिले होते. बहरामपूर लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील सहा जागांवर मागील निवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला तर एका जागेवर भाजपा जिंकली. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या मतदारसंघात काँग्रेस खातेही उघडू शकले नाही. २०१९ मध्ये कमी झालेला मताधिक्य आणि विधानसभा निवडणुकीतील चांगली कामगिरी त्यामुळे यंदा बहरामपूर जागेवर तृणमूलचा झेंडा फडकेल अशी आशा ममता बॅनर्जींना आहे. 

दरम्यान, जेव्हा कुणी क्रिकेटर अथवा कलाकार निवडणुकीच्या मैदानात उतरतो तेव्हा त्याचा वेगळा प्रभाव असतो. युसुफ पठाण क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव आहे परंतु अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या नेत्यासमोर केवळ प्रभावी नाव असणं पुरेसे नाही. बहरामपूरमधील जातीय समीकरण पाहता युसुफ विजयी होण्याची शक्यता टीएमसीला वाटते. जर मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान युसुफच्या पारड्यात टाकले तर अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे कठीण होईल. त्यातून युसुफ पठाणच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. भाजपाने या जागेवर डॉ. निर्मलकुमार साहा यांना मैदानात उतरवलं आहे. 

बहरामपूर मतदारसंघातलं जातीय समीकरण

बहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसYusuf Pathanयुसुफ पठाण