भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:49 AM2024-04-23T07:49:39+5:302024-04-23T07:50:16+5:30

शर्मा यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

Loksabha Election 2024 - Challenge of 'India' alliance ahead of BJP's third victory; Allies support Congress in jammu | भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

प्रशांत शिंदे

नवी दिल्ली : काश्मीरमधील तीन जागांवर इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. परंतु जम्मू, उधमपूर व लडाखमध्ये काँग्रेसला पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व माकपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जम्मूत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

१९७७ चा एक अपवाद वगळता १९९६ पर्यंत काँग्रेसने जम्मूत विजय मिळवला. २००२ च्या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या तालिब हुसैन यांनी विजय मिळवला होता. भाजपचे वैद्य विष्णू दत्त यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये सलग दोनदा ही जागा जिंकली होती. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे मदनलाल शर्मा येथून खासदार झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या जुगल किशोर शर्मा यांनी येथून निवडणूक जिंकली होती. शर्मा यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
२०१४ पासून विधानसभा निवडणुका झालेल्या नाहीत.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे. 
दहशतवाद, सीमेपलीकडून दगडफेक रोजगार, पर्यटन वाढवणे

२०१९ मध्ये काय घडले ? 

जुगल किशोर शर्मा
भाजप (विजयी)
८,५८,०६६ 

रमण भल्ला
काॅंग्रेस
५,५५,१९१

Web Title: Loksabha Election 2024 - Challenge of 'India' alliance ahead of BJP's third victory; Allies support Congress in jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.