चेन्नई - Narendra Modi Interview ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेकडील प्रचारावर जोर दिला आहे. यावेळी दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील निकाल अनपेक्षित असतील असा दावा मोदींनी केला आहे. भाजपा-एनडीए ही एक मजबूत आघाडी असून जी समाजातील प्रत्येक वर्गाला जोडते. प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करते. भाजपा एनडीएला मिळणारं मत हे डीएमकेविरोधी नाही तर भाजपा समर्थनासाठी आहे. मागील १० वर्षात आम्ही जे काम केलंय ते लोकांनी पाहिलंय. यंदा भाजपा एनडीए आघाडी जिंकणार हे तामिळनाडूनं ठरवलंय असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका तामिळ टीव्हीला मुलाखत दिली. त्यात विकसित भारताचा अर्थ देशातील प्रत्येक भागाला विकासाचं भागीदार बनवणं असल्याचं ते म्हणाले. विकसित भारतासाठी आपल्याला सर्वात आधी प्रत्येक राज्याचा विकास करायला हवा. तामिळनाडूमध्ये विकसित भारताच्या स्वप्नासाठी प्रेरण शक्ती बनण्याची क्षमता आहे. मी मागील ५ दशकं तामिळनाडू दौरा करतोय. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळात मी अज्ञातवासात होतो. आणीबाणीविरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी मी तामिळनाडूत आलो होतो अशी आठवण मोदींनी सांगितली.
त्याचसोबत १९९१ मध्ये मी कन्याकुमारी ते श्रीनगर एकता यात्रा काढली. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही लाल चौकात भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. त्यावेळी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या कुटुंबातील सदस्यही होते. आम्ही जम्मू काश्मीरात तिरंगा फडकवला होता असं मोदींनी म्हटलं.
मोदींना राग का येतो?
तामिळनाडूच्या महान वारशावर आपण अन्याय केल्यामुळे मला राग आहे. तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे, तरीही आपल्याला तिचा अभिमान नाही. हा समृद्ध वारसा जगभर साजरा झाला पाहिजे. तामिळनाडूच्या पाककृतीचे जागतिकीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे तमिळ भाषेच्या वापरालाही प्रोत्साहन दिले पाहिजे. तामिळ भाषेचे राजकारण करणे केवळ तामिळनाडूसाठीच नाही तर भारतासाठीही हानिकारक आहे असंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पवित्र सेंगोलचीही चर्चा
आपल्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीचे क्षण पवित्र सेंगोलशी जोडलेले आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे. हे सत्ता परिवर्तनाचे प्रतिक होते. नवीन संसदेत सेंगोल आपल्याला प्रेरणा देईल असे मी ठरवले होते. हे केवळ शेल्फवर ठेवलेले दागिने नसून, त्याला योग्य आदर दिला जाईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ते सादर करण्यात आले असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्षांचं कौतुक
आमचा एकही नगरपालिकेचा उमेदवार नसतानाही आम्ही तामिळनाडूसाठी काम केले. अण्णामलाई तरुणांना आकर्षित करत आहे. ते त्याच्याकडे पाहतात आणि विचार करतात की जर त्याच्या वागण्यामागे पैसा आणि भ्रष्टाचार कारणीभूत असता तर तो द्रमुकमध्ये सामील होऊ शकला असता. अण्णामलाई यांनी वैयक्तिक कारणांसाठी नव्हे तर राष्ट्रीय कारणांसाठी भाजपाची निवड केली. तो देश आणि तामिळनाडूसाठी काम करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.