ही नविडणूक सामान्य निवडणूक नाही. व्यक्तीशः माझ्यासाठी, ही निवडणूक महत्त्वाकांक्षेची नाही, ती महत्त्वाकांक्षा देशातील जनतेने 2014 लाच पूर्ण केली. 2024 ची ही निवडणूक मोदीच्या महत्वाकांक्षेसाठी नाही, तर मोदीसाठी एक ‘मिशन’ आहे आणि माझे मिशन आहे, देशाचे उज्ज्वल भविष्य, माझे मिशन आहे देशाला पुढे घेऊन जाणे. मात्र, काँग्रेसचा अजेंडा काय आहे? तर ते म्हणत आहेत, काश्मिरचे जे आर्टिकल 370 मी हटवले, ते 370 आम्ही पुन्हा लागू करू, असे म्हणज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते गुजरातमधील जुनागड येथे एक निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
मोदी म्हणाले, ‘या देशात जे लोक आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत ना, त्यांची सर्वसत्ता होती. संसदेत त्यांचेच राज्य होते, काश्मिरातही त्यांचे सरकार होते. मात्र, ते देशाचे संविधान कधीही सर्व ठिकाणी लागू करू शकले नही. मोदी येईपर्यंत देशात दोन संविधान होते. एका संविधानाने देश चलत होता आणि दुसऱ्या संविधानाने जम्मू-काश्मीर चालत होता.’ मोदी म्हणाले, काँग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जे लोक आपल्या शेजारील देशात हिंदू म्हणून राहतात, जी भारतमातेची लेकरं आहेत, त्यांचा केवळ एकच गुन्हा आहे, तो म्हणजे, ते हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी धर्माचे पालन करतात. यामुळे त्यांना तेथून हाकलून लावले जाते. मी त्यांना मताधिकार देण्याचा कायदा केला. ते (काँग्रेस वाले) म्हणत आहेत, आम्ही तो संपवू. मी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आव्हान देतो की, आपण देशात ना पुन्हा 370 आणू शकाल, ना CAA हटवू शकाल."
"मी तीन तलाकवर कायदेशीर बंदी आणली, माझ्या देशातील मुस्लीम मुलींना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा म्हणून, असेही मोदी म्हणाले. तसेच, ‘मी काँग्रेसला आव्हान देतो, राजकुमाराला आव्हान देतो, हिम्मत असे तर, पुन्हा तीन तलाकचे स्वातंत्र्य देऊ, असे उघडपणे बोलून दाखवा. मोदी आहे सामना करू शकणार नाही,’ असेही मोदी म्हणाले.