नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सुरू असलेल्या निवडणूक उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८८ जागांसाठी शुक्रवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील आठ जागांसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाले. निवडणूक आयाेगाने रात्री ११ वाजता ही आकडेवारी अपडेट केली. पश्चिम बंगाल, केरळमध्ये काही ठिकाणी बनावट मतदानाचे प्रकार घडल्याच्या तसेच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
सध्या काही राज्यांत उष्णतेची लाट आली आहे. त्याची तमा न बाळगता मतदार घराबाहेर पडले. शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात हाेऊन संध्याकाळी सहा वाजता ते संपले. दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमची पळवापळवी, बनावट मतदानाचे प्रकार घडू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
या नामवंतांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंदकाँग्रेस नेते शशी थरूर, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, अभिनेते अरुण गोविल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, अभिनेत्री हेमामालिनी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गजेंद्रसिंह शेखावत आदी.
राज्यात कुठे, किती मतदान?
बुलढाणा - ५८.४५ टक्केअकोला - ५८.०९ टक्केअमरावती - ६०.७४ टक्केवर्धा - ६२.६५ टक्केयवतमाळ - वाशिम - ५७.०० टक्के.हिंगोली - ६०.७९ टक्केनांदेड - ५९.५७ टक्केपरभणी - ६०.०९ टक्के