शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:17 AM

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये १०२ जागांसाठी जवळपास ६४ टक्के मतदान झाले आहे. तीन राज्ये वगळता १८ राज्यांत मतदानात ४ ते ६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गतवळेच्या तुलनेत यंदा पहिल्याच टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे राजकीय पक्ष  आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्था गोंधळात सापडल्या आहेत. तथापि, सत्ताधारी भाजपला त्याबाबत अवाजवी काळजी वाटत नसल्याचे दिसते. 

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. यावेळी मात्र छत्तीसगड (१ जागा), मेघालय (२) आणि त्रिपुरा (१) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये २०१९ निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे दिसते.  २०१९ मधील ३३२ जागांच्या तुलनेत पंतप्रधानांनी एनडीएसाठी ४००हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर भाजपने प्रचाराची जोरदार मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचत आहेत, तरीही बहुतांश जागेवर मतदान कमीच राहिले. 

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा कमी मतदानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आपल्या पक्षाला मोठा विजय मिळेल, असा दावा करणे टाळत आहेत. पक्षांच्या वॉर-रूम टीम कमी मतदानामागील कारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९च्या तुलनेत राजस्थानमधील काही जागांवर दहा टक्के कमी मतदान झाल्यामुळे सर्वात जास्त गोंधळ उडाला. राजस्थानात १२ जागांवर झालेली घसरण ५ टक्के आहे. तसेच, बिहार (४ जागा), उत्तर प्रदेश (८) आणि उत्तराखंडमधील (५ जागा) मतदान ४ ते ६ टक्के कमी आहे.

तापमान वाढ कारण?कमी मतदानाचे आणखी एक कारण म्हणजे वाढलेले तापमान. २०१९ मध्ये उष्णतेची लाट नव्हती. यंदा तापमान वाढीचा फटका मतदानावर झाल्याचे म्हटले जाते. कमी मतदान झाले असले तरी यावेळी मतदार गप्प असल्याने कोणालाही खात्री देता येत नाही, असे मत विश्लेषकांनी मांडले.   

पहिल्या टप्प्यातील मतदान, अंतिम आकडा आज येणार

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानाचा आकडा ६५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ९१ जागांसाठी ६९.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा पहिल्या टप्प्यात नेमके किती मतदान झाले याचा अंतिम आकडा निवडणूक आयोगाकडून रविवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग