एस. पी. सिन्हापाटणा : लाेकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सत्ताधारी एनडीएची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एनडीएमध्ये परतलेले नितीशकुमार यांच्या जदयूसमाेर आव्हाने असून, लाेकसभा निवडणुकीत भाजपशिवाय त्यांची नाैका पार हाेणे अवघड दिसत आहे. मात्र, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी चक्क एनडीएला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या वक्तव्यामुळे मतदानाच्या दाेन दिवस आधी राजकारण तापले आहे.
तेजस्वी यादव हे कटिहार येथे राजदच्या बीमा भारती यांच्या प्रचारसभेत बाेलत हाेते. पूर्णिया मतदारसंघात अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचे त्यांना आव्हान आहे. त्यांना पप्पू यादव यांना पराजित करायचे आहे. त्यामुळे मतदारांना तेजस्वी म्हणाले की, हा विचारधारेचा लढा आहे. तुम्ही ‘इंडिया’ किंवा ‘एनडीए’ला मतदान करा. बीमा भारती स्वीकार नाही, तर एनडीएला मत द्या. मात्र, पप्पू यादव यांना कदापि मत देऊ नका.
तेजस्वी यांची नवी खेळीपूर्णियामध्ये पप्पू यादव हे कदापि जिंकू नये, यासाठी तेजस्वी यादव यांनी कटिहारमध्ये प्रचारसभेत मतदारांना इंडिया किंवा एनडीएला मतदान करण्याचे आवाहन केले. विराेधी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन प्रथमच एखाद्या नेत्याने केले असेल. यादव यांना हरविण्यासाठी ते एनडीएचा विजय स्वीकारण्यास तयार आहेत, अशी चर्चा आहे.
जदयूसमाेर खडतर आव्हानदुसऱ्या टप्प्यात पाच जागांवर मतदान हाेणार असून, त्यापैकी ४ जागांवर जदयूने गेल्या निवडणुकीत विजय मिळविला हाेता. मात्र, यावेळी आव्हान खडतर आहे. कटिहार, पूर्णिया, बांका आणि भागलपूर येथे जदयूचे खासदार हाेते, तसेच किशनगंज येथूनही जदयूने उमेदवार दिला आहे.
...म्हणून सीमांचल हवे भाजपने बिहारच्या सर्व ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीमांचलमध्ये विजय मिळाल्यास काेसी आणि मिथिलांचलमध्येही फायदा हाेईल, असे भाजपला वाटते. अल्पसंख्याकबहुल सीमांचल भागातून एनडीए माेठा संदेश देऊ इच्छित आहे.
या ठिकाणी आहे आव्हानएनडीएच्या विजयामध्ये पूर्णिया व किशनगंज या दाेन जागांवर कडवे आव्हान आहे. पूर्णियामध्ये पप्पू यादव हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यामुळे काॅंग्रेस आणि राजदच्या मतांमध्ये विभागणी हाेण्याची भाजपला अपेक्षा आहे.