सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:33 PM2024-02-25T18:33:31+5:302024-02-25T18:34:04+5:30
आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे.
LokSabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. यामुळे प्रत्येक सभेत अरविंद केजरीवाल मतदारांना दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. रविवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात वाढीव पाण्याच्या बिलांसाठी दिल्ली सरकारने आणलेली वन टाइम सेटलमेंट योजना अधिकाऱ्यांनी थांबवल्याच्या मुद्द्यावर केजरीवालांनी भाष्य केले.
दिल्ली में पानी के ग़लत बिल आने से तक़रीबन 11 लाख परिवार परेशान हैं। हमारी सरकार पानी के इन ग़लत बिलों को ठीक करने के लिए स्कीम लेकर आई लेकिन भाजपा ने साज़िश करके उसे रोक दिया। लेकिन हम संघर्ष करेंगे, इस स्कीम को लागू करवा कर रहेंगे। https://t.co/aSn00EqDPj
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 25, 2024
मला नोबिल पारितोषिक दिला पाहिजे
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे लोक उपराज्यपालांचा वापर करत आहेत. अधिकारी प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. मी कोणत्या परिस्थितीत काम करतोय, हे मी सांगू शकत नाही. मी ज्या परिस्थितीत काम करत आहे, त्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी मिश्किल टिप्पणी केजरीवालांनी केली.
यावेळी केजरीवालांनी दिल्लीतील सातही जागा जिंकण्यासाठी इंडिया अलायन्सला मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही लोक माझ्यावर खूप प्रेम करता, पण लोकसभा निवडणूक येताच तुम्ही भाजपला मत देता. यावेळी दिल्लीच्या सातही जागा जिंकून इंडिया आघाडीला द्यायच्या आहेत. पाण्याचे बिल चुकीचे आहे असे लोकांना वाटत असेल तर ते भरण्याची गरज नाही, आम्ही भाजपच्या लोकांना मनमानी करू देणार नाही. भाजपचे लोक तुमच्यावर कितीही अत्याचार करतील, मी त्यामध्ये भिंत बनून उभा राहीन, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.