शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 6:33 PM

आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे.

LokSabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. यामुळे प्रत्येक सभेत अरविंद केजरीवाल मतदारांना दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. रविवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात वाढीव पाण्याच्या बिलांसाठी दिल्ली सरकारने आणलेली वन टाइम सेटलमेंट योजना अधिकाऱ्यांनी थांबवल्याच्या मुद्द्यावर केजरीवालांनी भाष्य केले. 

मला नोबिल पारितोषिक दिला पाहिजेआम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे लोक उपराज्यपालांचा वापर करत आहेत. अधिकारी प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. मी कोणत्या परिस्थितीत काम करतोय, हे मी सांगू शकत नाही. मी ज्या परिस्थितीत काम करत आहे, त्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी मिश्किल टिप्पणी केजरीवालांनी केली.

यावेळी केजरीवालांनी दिल्लीतील सातही जागा जिंकण्यासाठी इंडिया अलायन्सला मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही लोक माझ्यावर खूप प्रेम करता, पण लोकसभा निवडणूक येताच तुम्ही भाजपला मत देता. यावेळी दिल्लीच्या सातही जागा जिंकून इंडिया आघाडीला द्यायच्या आहेत. पाण्याचे बिल चुकीचे आहे असे लोकांना वाटत असेल तर ते भरण्याची गरज नाही, आम्ही भाजपच्या लोकांना मनमानी करू देणार नाही. भाजपचे लोक तुमच्यावर कितीही अत्याचार करतील, मी त्यामध्ये भिंत बनून उभा राहीन, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा