LokSabha Election INDIA Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विरोधकांच्या INDIA आघाडीत सामील असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) ने सोमवारी(दि.26) केरळमध्ये चार उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सीपीआयने तिरुवनंतपुरममधून पन्नियान रवींद्रन आणि वायनाडमधून ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. तर, व्हीएस सुनील कुमार त्रिशूरमधून आणि अरुण कुमार मावेलिकारामधून निवडणूक लढवणार आहेत.
राहुल गांधी आणि शशी थरुरांविरोधात उमेदवारविशेष म्हणजे, शशी थरुर तिरुवनंतपुरमचे आणि राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत. अशा स्थितीत राहुल गांधींना वायनाडमध्ये सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा आणि शशी थरुर यांना तिरुवनंतपुरममध्ये पन्नियान रवींद्रन यांचे आव्हान असेल. CPI ने केरळमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 4 उमेदवार उभे केले होते, परंतु एकही जागा जिंकता आली नाही. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत, त्यापैकी 2019 मध्ये काँग्रेसला 15 तर इंडियन युनियन मुस्लिम लीगला 2 जागा आणि सीपीआय (एम), केसी (एम) आणि आरएसपीने प्रत्येकी 1 जागा जिंकली होती.
राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार?काही मीडिया रिपोर्टनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडू शकतात. राहुल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या 2 जागांवरुन निवडणूक लढवतील, ज्यात कर्नाटक किंवा तेलंगणातील एक जागा आणि उत्तर प्रदेशातील एक जागा (अमेठी किंवा रायबरेली) असेल.
PM मोदींचा केरळ दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तिसऱ्यांदा केरळच्या दौऱ्यावर जात आहेत. पीएम मोदी मंगळवारी अधिकृत कार्यक्रमासाठी केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे पोहोचणार आहेत, जिथे ते भाजपच्या राज्य युनिटने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होतील. या राज्यात लोकसभा निवडणुकीत काही जागा जिंकण्याची पक्षाला आशा आहे.