कानळदा ग्रा.पं.ला ठोकले कुलूप ग्रामसेवक येईना : कार्यालय दिवसा बंद रात्री सुरू
By admin | Published: July 16, 2016 10:38 PM
कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले.
कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले. ग्रामसेवकाकडे दोन, तीन गावांचा प्रभार आहे. त्यामुळे ते येत नसल्याची माहिती दिली जाते. ग्रामस्थांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. १५ तारखेला ग्रामपंचायतीचे कार्यालय रात्री उघडण्यात आले होते. दिवसा कार्यालय बंद असते, ग्रामसेवक नसतो, मग रात्री कार्यालय सुरू का केले, असा मुद्दाही अनेक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तलाठीही प्रभारीकानळदा गावाची लोकसंख्या २५ हजार एवढी आहे. तर आजूबाजूला फुपनगरी, वडनगरी, कुवारखेडा ही गावे आहेत. असे असताना गावात प्रभारी तलाठी आहे. तलाठ्याकडे ऑनलाईन कामकाज होत नाही. त्यामुळे सातबार्यावरील नोंदी घेणे, नोंदी दाखले पाहून नष्ट करणे ही कामे होत नाहीत. उतारे कोरे आणा आणि कर्ज घ्या,बोजे हटवा, असे सहकारी व राष्ट्रीयकृत बँका म्हणतात. परंतु तलाठीच नसल्याने सातबारा उतार्यांवरील बोजे कसे दूर होणार, असा प्रश्न आहे. मागील १५ दिवसांपासून तलाठीही गावात आलेला नाही. किमान दोन दिवस तलाठी गावाय यायला हवा. अनुदान रखडलेमागील खरीप हंगामाचे अनुदानही मिळालेले नाही. तलाठीच नसल्याने याबाबत कार्यवाही होत नाही. सातबारा, पीक नोंदी असे दाखले मिळत नाहीत. त्यातच पंचक्रोशीतील फुपनगरी, वडनगरी, कानळदा येथील शेतकर्यांचे खरिपाचे अनुदानही रखडल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत ग्रामस्थ लेखी तक्रार करणार आहेत. (वार्ताहर)