शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

मी असेपर्यंत पक्षात फूट पडू शकत नाही

By admin | Published: September 17, 2016 3:14 AM

मी असेपर्यंत पक्षात कोणतीही फूट पडू शकत नाही, असे सांगून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पक्षात उफाळलेल्या गटबाजीवरील मौन शुक्रवारी येथे सोडले.

मीना कमल, लखनौमी असेपर्यंत पक्षात कोणतीही फूट पडू शकत नाही, असे सांगून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पक्षात उफाळलेल्या गटबाजीवरील मौन शुक्रवारी येथे सोडले. त्यांचे भाऊ आणि ज्येष्ठ मंत्री शिवपाल यादव यांनी मंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुलायम यांनी डॅमेज कंट्रोल मोहिम हाती घेतली आहे आणि त्यांचे राजीनामे फेटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश हे शिवपाल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली.मुलायमसिंग यांच्या मध्यस्थीनंतर समाजवादी पक्षातील वाद संपल्याचे वरवर दिसत असले तरी पुढील आठवडाभरात काय घडना होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या वादांचा निवडणुकांवर परिणाम होईल, असे भाजपाचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत.भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे हकालपट्टी झालेले खाणमंत्री गायत्री प्रजापती यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे सूचित करून अखिलेश आपला शब्द मोडणार नाहीत, असा विश्वासही मुलायम यांनी व्यक्त केला. प्रजापतींवरूनच संघर्षाची ठिणगी पडली होती. मुलायमसिंह हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की, कुटुंब मोठे आहे. सर्वांनी एकोप्याने काम करायला हवे. रामगोपाल, अखिलेश आणि शिवपाल यांच्यात कोणताही संघर्ष नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवपाल यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. चार मुद्यांवर समझौता झाला!1. प्रजापती यांना खाण मंत्रालयाऐवजी दुसरे खाते दिले जावे.2. शिवपाल यादव यांच्याकडून काढून घेतलेले सगळे विभाग त्यांना परत केले जातील. यात अखिलेश यादव यांचे काढून घेऊन शिवपाल यादव यांना दिलेले पक्षाचे अध्यक्षपद अखिलेश यांच्याकडेच राहील.3. कोणा मध्यस्थाने आपापसात फूट पाडायचा प्रयत्न केला तर तो त्याला ते स्थान गमवावे लागेल. येथे अमरसिंह यांचे नाव घेऊन चर्चा झाली. त्यावर मुलायम सिंह म्हणाले की,‘‘अशा लोकांना धडा शिकविण्याचे काम मी किंवा तू (अखिलेश) करशील.’’4. दीपक सिंघल यांना पुन्हा मुख्य सचिवपद आताच दिले जाणार नाही. या विषयावर मुलायम सिंह यादव यांचा कल पाहून अखिलेश यादव यांनी यावर आम्ही नंतर विचार करू असे म्हटले.आपण नेतांजीसोबत : शिवपालपक्षातील पदे आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना सपाचे नेते शिवपाल यादव यांनी आपण सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यासोबत असल्याचे सांगितले. मुलायमसिंह यांनी भाऊ आणि मुलात समेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. सात, कालीदास मार्ग येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना संबोधित करताना शिवपाल म्हणाले की, आम्हा सर्वांना पक्षाला बळकट करायचे आहे. आम्ही नेतांजीसोबत (मुलायम) आहोत. त्यांचा संदेश आमच्यासाठी आदेश आहे. शिवपाल यांच्या पत्नी सरला यांनी ईटावा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून मुलगा आदित्य याने प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्षपद सोडले आहे.