बंगळुरू- मंदिरात जाताना चपला बाहेर काढून जाण्याची पद्धत आहे. मंदिरात जाऊन देवाचा दर्शन घेताना भक्त श्रद्धेने चपला बाहेर काढतात. पण कर्नाटकातील एक फेस्टिव्हलपाहून सगळ्यांनाच नवल वाटेल. कर्नाटकातील लोक अद्भूत असा फूटवेअर फेस्टिव्हल साजरा करतात. वर्षातून दोन दिवस हा सोहळा पार पडतो. देवीकडे मागितलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्तांकडून देवीला चपलांचा हार अर्पण केला जातो.
नुकतंच कर्नाटकमध्ये हा अनोखा उत्सव पार पडला. अलांद तालुकमधील गोला गावात असलेल्या लकम्मा देवी (लक्ष्मी देवी) मंदिरात मंगळवारी शेकडो भक्तांनी एकत्र येऊन हा फेस्टिव्हल साजरा केला. कलाबुरगी आणि शेजारील जिल्ह्यातून हजारो भाविक या देवीच्या मंदिरात एकत्र आले होते. अनोखं नाव आणि पद्धत असलेल्या या फेस्टिव्हलसाठी भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. कर्नाटकातील लकम्मा देवीच्या मंदिराच दरवर्षी दिवाळीच्या सहा दिवसांनी हा फेस्टिव्हल साजरा होता. यावेळी प्रत्येक जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि देवीकडे आपली इच्छा मागतात. भाविकांची इच्छापूर्ती झाल्यावर चपलांचा हार मंदिराच्या बाहेर असलेल्या झाडाला बांधला जातो. भाविकांकडून देवीला शाखाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा नैवेद्यही दाखविला जातो. तसंच भाविकांकडून देवीला साडी अर्पण केली जाते.
देवी चपला घालते आणि वाईट शक्तींपासून लोकांचा बचाव करते आणि आरोग्याच्या समस्या दूर करते, असं मत एका भाविकाने व्यक्त केलं आहे.