नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असून केंद्र सरकारने यासाठी एक विशेष प्रणाली विकसित केली आहे.गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. दहशतवादी गटांना विविध माध्यमाने होणाऱ्या आर्थिक मदतीवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने ‘कॉम्बेटिंग फायनान्सिंग आॅफ टेरर’ (सीएफटी) नावाचा एक विशेष गट स्थापन केला आहे. इ.स.२०११ साली स्थापित या गटावर दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्यांच्या गुप्तचर संस्थांसोबत समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) ‘इंटीग्रेटिंग मॉनिटरिंग आॅफ टेररिझम’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने दहशतवाद्यांना आर्थिक मदतीसंबंधात सर्व प्रकरणांची माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाते. गृहमंत्रालयही अर्थमंत्रालयाच्या आर्थिक कृतीदलाशी समन्वय राखून आहे.
अतिरेक्यांना आर्थिक बळ देणाऱ्यांवर नजर
By admin | Published: December 09, 2015 11:16 PM