शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चिटफंड कंपन्यांविरुद्ध पाश आवळला

By admin | Published: August 17, 2015 12:54 AM

मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)गेल्या आर्थिक वर्षात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली

हरीश गुप्ता , नवी दिल्लीमोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)गेल्या आर्थिक वर्षात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ५७ तर सीबीआयने ६५ प्रकरणे नोंदवत तपासाला वेग दिला आहे. त्याचवेळी या तपास यंत्रणांना अधिक बळ देण्यासाठी संशयास्पद चिटफंड कंपन्यांचा डाटा तपासण्यासाठी संगणकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे.कंपनी व्यवहार मंत्रालयाने १३९ प्रकरणांचा तपास गंभीर घोटाळ््यांचा तपास कार्यालयाकडे (एसएफआयओ) सोपविला आहे. पूर्व आणि ईशान्य राज्यांमध्ये पॉन्झी योजनांचे पीकच आल्याचे धक्कादायक तथ्य तपासात उघड झाले. संपुआ सरकारच्या काळात २०१३ पर्यंत केवळ ७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, मात्र २०१४ ते जून १५ पर्यंत या तक्रारींची संख्या ६५ पर्यंत गेली आहे. ईडीने अशा कंपन्यांची ११३३.२५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून तीन प्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत खटले दाखल केले आहेत.सेबीने सहारा समूहावर धडक कारवाई करीत दणका दिला आहे. प. बंगाल, झारखंड, ईशान्येकडील राज्यांसह ओडिशा आणि अन्य राज्यांमध्येही चिटफंड घोटाळ्यात अडकलेले राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्ती कारवाईच्या बडग्याने हादरले आहेत. चिटफंड कंपन्यांनी गोळा केलेला पैसा गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश सेबीने दिला असला तरी कंपन्यांकडून याचे पालन झालेले नाही. सेबीला ज्यादा अधिकार देण्यात आल्यापासून सुधारित कायद्यानुसार तपास आणि खटल्यांना गती देण्यासह निधी गोळा करण्यावरही नियंत्रण आणले गेले आहे.