- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : स्वयंपाक गॅसच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याची मागणी बुधवारी काँग्रेसने केली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर म्हटले की, “गेल्या सात वर्षांत जनतेसमोर उलटा विकास झाला आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आकडेवारी देत उज्जवला योजनेच्या आडून मोदी सरकार गरिबांची लूट करीत असल्याचा आरोप केला.श्रीनेत म्हणाल्या की, वाढलेले भाव हा फक्त जागतिक वृद्धीचा परिणाम नसून हा सरकारने घेतलेला विचारपूर्वक निर्णय आहे. एकीकडे सरकार रॉकेलला दूर करून उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब जनतेला मोफत जोडणी देण्याचे बोलते तर दुसरीकडे मिळणारे अनुदान अर्थसंकल्पात नसते. २०१४ मध्ये केंद्र सरकारकडून एक लाख ४७ हजार कोटी रूपयांचे अनुदान इंधनावर दिले गेले होते. ते घटवून फक्त १२ हजार कोटी रूपये केले गेले.” पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी ट्वीटरवर म्हटले की, “एक जुलै रोजी स्वयंपाकाच्या गॅसवर मोदी सरकारने २५ रूपये वाढवले आणि १७ ऑगस्ट रोजी पुन्हा २५ रूपये वाढवले. उज्ज्वलाचे स्वप्न दाखवून दर महिन्याला स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढवून भाजप सरकारची वसुली योजना आकार घेत आहे.”
संधी सोडत नाहीराज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका पाहता विशेषत: सामान्य जनतेशी संबंधित असलेले मुद्दे असल्यावर काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही.