नवी दिल्ली-
बाहुबली सेवक (Bahubali Servant) नावानं लोकप्रिय झालेले अनिल गोचिकर एक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आहेत. इंजिनिअरिंगची डीग्री मिळवल्यानंतर जेव्हा ते आपल्या पुरी येथील राहत्या घरी परतले तेव्हा आपल्या भावाची प्रेरणा घेऊन बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली होती.
कोण आहे भगवान 'जगन्नाथ'चे 'बाहुबली' बॉडीगार्डभगवान जगन्नाथचे बाहुबली बॉडीगार्डचं नाव अनिल गोचिकर (Anil Gochikar) असं आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेले गोचिकर लहानपणापासूनच आखाड्यांमध्ये सहभाग घेत आले आहेत. बॉडी बिल्डिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अनिल गोचिकर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. गोचिकर कुटुंबीय पीढ्यानपीढ्या भगवान जगन्नाथची वैयक्तिकरित्या सुरक्षा दलात कार्यरत राहिलेले आहेत.
आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्स चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं सुवर्ण!सातवेळा मिस्टर ओदिशा (Mr.Odisha) आणि तीन वेळा इस्टर्न इंडिया चॅम्पियनशीप (Eastern India Champion) अनिल गोचिकर यांनी पटकावली आहे. इतकंच नव्हे, तर गोचिकर यांनी चारवेळा मिस्टर इंडिया पुरस्कार जिंकला आहे. २०१४ साली वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावलं होतं. याशिवाय २०१८ साली दुबईत झालेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स चॅम्पियनशीप स्पर्धेत गोचिकर यांनी सुवर्ण पदक नावावर केलं होतं.
अनिल गोचिकर शुद्ध शाकाहारीगोचिकर यांची पीळदार आणि आकर्षक शरीरयष्टी पाहून तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांनी केवळ मांसाहारी भोजनातून किंवा अंडी खाऊन अशी शरीरयष्टी बनवली असेल तर तुम्ही चुकत आहात. अनिल गोचिकर शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या मतानुसार तुम्ही जर शाकाहारी असाल आणि तुम्हाला चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी मांसाहारी व्यक्तीच्या तुलनेत अधिक व्यायाम करावा लागेल.
'देवाची सेवा केली नाही तर या शरीराचा काय उपयोग'देवाच्या सेवेसाठी काही योगदान दिलं नाही तर या शरीराचा काय उपयोग असं अनिल गोचिकर म्हणतात. बाहुबली बॉडीगार्डचा ईश्वरी शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे. कोरोना-१९ काळात अनिल गोचिकर ग्रँड रोड येथे रथ खेचताना दिसले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सचं भरपूर प्रेम त्यांना मिळालं होतं.