शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:29 AM

कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली.

कोरोनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एकेकाळी बंगालमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या श्याम सुंदर यांच्यासाठी लॉकडाऊन वरदान ठरलं आहे. मजुरीचं काम सोडून ते कटिहार या गावी परतले आणि रसगुल्ला बनवण्याची फॅक्ट्री काढली. आज कटिहार, पूर्णिया, भागलपूरसह बंगालमध्ये रसगुल्ल्याचा पुरवठा केला जातो. रोज पाच क्विंटल रसगुल्ल्याचा पुरवठा होतो. यामुळे महिन्याभरात चांगलं उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर त्यांनी अनेकांना रोजगारही दिला आहे. श्याम सुंदर दररोज 80 हजार रुपयांच्या रसगुल्ल्याची विक्री करतात.

कटिहारच्या सौरिया पंचायतीच्या सिहला गावातील श्याम सुंदर साह यांची गोष्ट ही लोकांना हार न मानण्याची प्रेरणा देते. कटिहारच्या डंडखोरा ब्लॉकमध्ये मिठाई बनवण्याची फॅक्ट्री सुरू करून ते दररोज 5 क्विंटल मिठाईचा पुरवठा करत आहेत. या कामात त्यांची पत्नी रीता देवी त्यांना पूर्ण सहकार्य करते. कोरोनाच्या आधी श्याम सुंदर साह बंगालमधील एका कारखान्यात रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे. पण कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली.

श्याम सुंदर साह अवघ्या चार रुपयांत मिठाई तयार करतात आणि संपूर्ण कटिहार जिल्हा तसेच शेजारील जिल्हे आणि बंगालमध्ये होलसेल पुरवठा करतात. ते येथे 160 रुपये किलो दराने मिठाई विकतात. अशा स्थितीत दररोज 80 हजार रुपयांची विक्री होते. त्यामुळे त्यांचा रोजगारही चांगला चालला आहे. त्यांच्या फॅक्ट्रीत सध्या अनेक लोक काम करतात. 

शासनाकडून सहकार्य मिळाल्यास या फॅक्ट्रीचा विस्तार करून 50 ते 100 जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, असे श्याम सुंदर सांगतात. या व्यवसायात श्याम सुंदर यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी रिता देवी सांगतात की, त्यांचे पती पूर्वी राज्यात इतरत्र मजुरीचं काम करायचे आणि आता स्वत: फॅक्ट्री सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. अनेकांना यामुळे खूप दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी