पाण्यासाठी शहरवासीयांचे रात्रभर जागरण नागरिकांचे प्रचंड हाल : पाण्याच्या अनिश्चिततेने महिलांची उडाली झोप; अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
By admin | Published: March 13, 2016 12:04 AM
जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निित वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले. काही भागात कमी दाबाने तसेच पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यानेनागरिकांचेप्रचंडहालझाले.हीचपरिस्थितीशनिवारीदिवसभरवरात्रीहोती.
जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निित वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले. काही भागात कमी दाबाने तसेच पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यानेनागरिकांचेप्रचंडहालझाले.हीचपरिस्थितीशनिवारीदिवसभरवरात्रीहोती.मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडला होता. त्यानंतरगळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू होतेे. ही दुरुस्ती शुक्रवारी दुपारी पूर्ण झाली. त्यानंतर शहराती पाण्याच्या टाक्या भरण्यास प्रारंभ झाला व शुक्रवारी रात्रीपासूनच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. --------इन्फोदुर्लक्षचा फटका कस्तुरी हॉटेलनजीकचा हा व्हॉल्व्ह चार वर्षांपूर्वी एकदा खराब झाला होता. त्यानंतर त्याच्या दुरूस्तीकडे गांभीर्याने कोणीच लक्ष दिले नाही. तत्कालीन पाणी पुरवठा सभापती व विद्यमान स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी याबाबत सूचना देऊनही पाणी पुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले त्याचा फटका ऐन उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना बसला. ------अनेकांचे रात्रभर जागरण पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नियोजित वेळापत्रकाच्या १५ तास उशिराने महाबळ परिसर, प्रेमनगर परिसर, वाल्मीक नगर, कांचन नगर अशा पाणी पुरवठ्याच्या विविध टप्प्यात रात्री १२ वाजेनंतर पाणी पुरवठा सुरू झाला मात्र त्याच्या वेळा निित नव्हत्या, त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अनेक भागात रात्री १२ नंतर पाणी येईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात मध्यरात्री २ वाजेनंतर ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पाणी आले. तेही कमी दाबाने झाल्याने नागरिकांचे हाल झाले.शनिवारीही बर्याच भागात पाणी पुरवठा झाला मात्र तोदेखील १० ते १२ तास उशिराने झाल्याचे सूत्रांनी सांगितले.