ईशान्येत ‘कमळ’काल! ५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:19 AM2023-03-03T06:19:40+5:302023-03-03T06:20:00+5:30

अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.

"Lotus" in the northeast! What happened in the by-elections in 5 states? | ईशान्येत ‘कमळ’काल! ५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

ईशान्येत ‘कमळ’काल! ५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

googlenewsNext

नवी दिल्ली : पूर्वोत्तर भारतातील त्रिपुरा आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपने बाजी मारली, तर  मेघालयात मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आकडेवारीनुसार सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु बहुमताचा आकडा गाठण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संगमा यांनी अमित शाह यांना फोन करून पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत राहणार आहे.

त्रिपुरात दुसऱ्यांदा सत्ता
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजप-आयपीएफटी युतीने ६० पैकी ३३ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपला ३२ तर इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला एक जागा मिळाली. 
नागालँडमध्येही बहुमत
नागालँडमध्ये सत्ताधारी एऩ़़डीपीपी-भाजप युतीने ६० सदस्यांच्या विधानसभेत ३७ जागा जिंकून बहुमत मिळवले. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (एनडीपीपी) २५ जागा जिंकल्या, तर त्यांच्या सहयोगी भाजपला १२ जागा मिळाल्या.   

मेघालयमध्ये भाजप किंगमेकर
मेघालयात संगमा यांचा पक्ष २६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तरी बहुमताचा ३१ चा आकडा काही गाठता आला नाही. संगमा यांनी  पाठिंब्यासाठी अमित शाह यांना फोन केल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. संगमा यांनी आधीच निवडणुकीपूर्वी तुटलेली भाजपसोबतची त्यांची युती पुन्हा होऊ शकते, असे संकेत दिले होते. 

५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

अरुणाचलमध्ये भाजपचे जांबे ताशी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लुमला जागेवर भाजपच्या त्सेरिंग ल्हामू बिनविरोध निवडून आल्या.
पाच राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती, तर महाराष्ट्रात दोन जागा होत्या. एकूण सहा जागांपैकी तीनवर काँग्रेसने विजय मिळविला.

नागालँडमध्ये पहिल्यांदाच महिला आमदार
१९६३ मध्ये नागालँड राज्य झाल्यापासून पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आल्या आहेत. एनडीपीपीच्या ४७ वर्षीय हेकानी जाखालू या दिमापूर येथून विजयी झाल्या. 

Web Title: "Lotus" in the northeast! What happened in the by-elections in 5 states?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.