नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आपपेक्षा भाजप वरचढ ठरणार असल्याचे बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या विविध एग्झिट पोलच्या निष्कर्षांत म्हटले आहे.
काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता नाही, असेही त्यात म्हटले आहे. निवडणुकांत ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले व ८ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
३६ जागा बहुमतासाठी आवश्यक. गेल्या वेळच्या निवडणुकीत आपने ६२ तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या.