शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Loudspeaker in UP: CM योगींच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात 1 लाख भोंगे खाली उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 10:15 AM

Loudspeaker in UP: एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण पेटलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही वादाशिवाय भोंगे उतरवण्यात आले आहेत.

Loudspeaker in Uttar Pradesh : एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन गदारोळ सुरू आहे. लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही गोंधळाशिवाय लाऊडस्पीकर खाली उतरवले जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, आतापर्यंत राज्यात सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत.

मुस्लिमांचा विरोध नाहीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आमच्या सरकारने हा मुद्दा चांगल्याप्रकारे हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर हटवल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. यूपी पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरविरोधात मोहीम राबवत आहेत.

रस्त्यावरील नमाजही बंदसीएम योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्द्यावरुन स्वतःच्या सरकारची पाठ थोपटली. ते म्हणाले की, आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीदेखील ईदसारख्या मुहूर्तावर कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करून आदेशाचे पालन करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसे