शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

राँग नंबरमुळे प्रेम झाले...

By admin | Published: March 01, 2017 4:34 AM

तुम्हालाही अनेकदा राँग नंबरवरून कॉल्स येत असतील

तुम्हालाही अनेकदा राँग नंबरवरून कॉल्स येत असतील; परंतु अशा कॉलनंतर दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? सोफयां लोहो डानडेल या तरुणासोबत मात्र असे घडले; मात्र वस्तुस्थिती समोर आल्यानंतर तो थक्क झाला. एक दिवस सोफयांच्या फोनवर राँग नंबरवरून कॉल आला. हा कॉल महिलेचा होता. तिच्या मधुर आवाजाने त्याला मोहित केले. या कॉलमुळे आपले पुढचे जीवन बदलून जाईल हे त्याला कुठे ठाऊक होते. तो फोनवरून ज्या महिलेशी बोलत होता तिचे नाव मार्था पोटू होते. पहिल्या कॉलनंतर तो नंतर तिच्याशी नेहमी बोलू लागला. हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. अनेक दिवस त्यांच्यात पे्रमालाप होत राहिला. दोघांमधील प्रेम एवढे वाढले की, एक दिवस मार्थाला भेटण्यासाठी सोफयां तिच्या घरी पोहोचला; मात्र मार्थाला पाहताच त्याच्या पायाखालची जमीन घसरली. सोफयां याने दारावरची बेल वाजविल्यानंतर ८२ वर्षांच्या महिलेने दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द मार्था होती. मार्थाची हकीकत कळल्यानंतर सोफयांला दु:ख झाले; परंतु त्याचे प्रेम अस्सल होते. मार्थापूर्वी आपण कोणालाही डेट केले नव्हते, असे त्याने सांगितले. मार्थाच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. मार्थाला दोन मुले असून ते नोकरीनिमित्त बाहेरच्या देशांत राहतात. मार्था एकटी राहत होती. सोफयांने मार्थाला लग्नाची मागणी घातली आणि दोघे विवाहबद्ध झाले. मार्थाच्या कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केला होता; मात्र नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला.