शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पत्नी गेली आणि प्रेयसीही गेली! लव्हगुरू मटुकनाथच्या नशिबी आले एकाकीपण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 3:16 PM

प्रेमासाठी काय पण म्हणत जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह रचणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ दशकभरापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे. मात्र....

पटना - प्रेमासाठी काय पण म्हणत जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह रचणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ दशकभरापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे. मात्र प्रेमासाठी पत्नीला सोडणाऱ्या 64 वर्षीय मटुकनाथ यांची प्रेयसीही त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे या लव्हगुरूंच्या नशिबी आता एकाकीपण आले आहे. काही वर्षांपूर्वी लव्हगुरू प्राध्यापक मटुकनाथ आणि आणि त्यांची विद्यार्थिनी ज्युली कुमारी यांची लव्हस्टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर मटुकनाथ यांनी पत्नीला सोडत ज्युलीसोबत संसार थाटला होता. मात्र त्यांची ही लव्हस्टोरी आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यांची प्रेयसी ज्युलीने सध्या आध्यात्माच्या दिशेने पावले वळवली आहेत. त्यामुळे मटुकनाथ यांच्यावर सध्या एकाकी जीवन जगावे लागत आहे. याबाबत विचारले असता मटुकनाथ म्हणाले, " वेळ कधी बदलेल हे कुणालाच सांगता येत नाही. माझ्यासोबतही असेच झाले आहे. आम्ही दहा वर्षे एकत्र संसार केला. मात्र अचानक ज्युलीला संसारिक जीवनापासून विरक्ती आली." मटुकनाथ आणि ज्युली यांची भेट 2004  साली झाली होती. त्यावेळी ते 51 वर्षांचे होते तर ज्युली 21 वर्षांची होती. दोन वर्षांनंतर त्यांची लव्हस्टोरी देशभरातील वृत्तपत्रे आणि टिव्ही चॅनलमधील चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर पाटणामधील बीएन कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले मटुकनाथ या प्रेमप्रकरणावरून अडचणीत सापडले होते. आरोप प्रत्यारोपांनंतर मटुकनाथ यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. तसेच कॉलेजमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मटुकनाथ यांच्या पत्नीने चॅनेलच्या पत्रकारांसह एका घरावर धाड टाकून मटुकनाथ आणि ज्युली यांना रंगेहात पकडून दिले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळेही फासले होते.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBiharबिहारnewsबातम्या