पाटना - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये एकमेकांना भेटणं थोडसं कठीण झालं आहे. मात्र प्रेमात पडलेली मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी नानाविध शक्कल लढवत असलेल्या पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लपूनछपून भेटणं एका प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. रात्रीची भेट त्याच्या जीवावर बेतली आहे.
प्रेमासाठी काही जण वाटेल ते करायला तयार होतात. अशीच एक घटना पाटणामध्ये घडली आहे. प्रेयसीला रात्री लपूनछपून भेटायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गावी गेला. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच तरुणाचा एक मित्रही त्याला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत होता. त्यालाही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या शेखपुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराला प्रेयसीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्राची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिरा कुमार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं. तो कोचगावचा रहिवासी होता. आपल्या प्रेयसीला भेटायला हिरा तिच्या गावी आला होता.
रात्री लपूनछपून भेटत असताना काही लोकांनी त्यांना पकडलं आणि मुलीच्या नातेवाईकांना त्यांची माहिती दिली. या घटनेनंतर गावकरी देखील जमा झाले आणि त्यांना प्रियकर आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला
राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती
देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू
मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला