हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशात प्राणवायूची टंचाई आणि त्याच्या वितरणाच्या गैरव्यवस्थेमुळे हृदय विदीर्ण करणारी दृश्ये असताना, त्यात रविवारी अत्यंत कमी लसीकरणाचा प्रश्न समाविष्ट झाला आहे. दोन एप्रिल रोजी एका दिवसात देशात ४२.७० लाख लस दिली गेली होती, तर त्याचे दुसरे टोक दोन मे रोजी फक्त ३.८० लाख लसदिली जाऊन गाठले गेले. हे धक्कादायक होते. कारण एक मेपासून देशभर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची मोहीम सुरू झाली. एक मेरोजी देशात १८.३० लाख मात्रा आणि ३० एप्रिल रोजी २७.४० लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, “राज्यांकडे ७५ लाखांपेक्षा जास्त लसीच्या मात्रा असताना, त्यांनीच खुलासा केला पाहिजे. राज्यांना वेळेत लस उपलब्ध करून देणे हे आमचे आणि त्यांनी लोकांचे लसीकरण करणे हे त्यांचे काम आहे.” खूप कमी लसीकरण झाले, त्याची कारणे लॉकडाऊन, निर्बंध आणि इतर काही प्रश्न असू शकतात. परंतु, दोन मेरोजी फक्त ३.८० लाख लसीकरण झाले, याबद्दल केंद्र सरकार कमालीचे नाराज आहे. लसीकरणाचा वेग मंद असेल तर त्याचा थेट परिणाम रुग्ण आणि मृत्यू वाढण्यात होईल, असे अधिकारी म्हणाला.
महाराष्ट्रात रविवारीफक्त २० हजार डोसn महाराष्ट्राने रविवारी २० हजार चार इतकी कमी लस दिली. n दिल्लीत हीच संख्या ३७०० होती. महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांतच कोरोनाचे रुग्ण कमी होतआहेत. n सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशने १५ हजार ३००, तर गुजरातने ५३ हजार ६०० मात्रा रविवारी दिल्या.