एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मोफत मिळू शकतो. या ऑफर अंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यास ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत केले जाणार आहेत. या विशेष ऑफर अंतर्गत सिलिंडरची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे त्या ग्राहकाला परत केले जाणार आहे. मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएम आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे. या ऑफिर अंतर्गत ग्राहकांना पेटीएमद्वारे आपला एलपीजी सिलिंडर बुक करावा लागेल. ही ऑफर सर्वच कंपन्यांच्या सिलिंडरवर लागू आहे. जे ग्राहक पहिल्यांदाच पेटीएमचा वापर करत आहेत, अशा ग्राहकांनाच या सुविधेचा फायदा मिळणार आहे. कसा घ्याल लाभ?या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाच्या मोबाईलमध्ये Paytm अॅप असणं आवश्यक आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप नसेल तर ते डाऊनलोड करा. यानंतर त्या ठिकाणी दिलेल्या ऑप्शनमधून सिलिंडर बुक करा. पेटीएममधून एलपीजी सिलिंडर बुक केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ७०० रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. याचाच अर्थ सिलिंडरसाठी देण्यात येणारी संपूर्ण रक्कम कॅशबॅकच्या रूपात मिळण्याची शक्यता आहे. सध्या दिल्लीत १४.२ किलोच्या अनुदानीत सिलिंडरची किंमत ६९४ रूपये आहे. पेटीएमच्या या ऑफरचा लाभ तेव्हाच घेता येऊ शकेल जेव्हा बुकींग अमाऊंट ५०० रूपये किंवा त्याच्यावर असेल. तसंच ३१ जानेवारीपर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. ज्यावेळी ग्राहक याची रक्कम भरेल त्यानंतर त्याला एक स्क्रॅच कुपन देण्यात येईल. २४ तासांच्या आत हे कुपन ग्राहकांना मिळणार आहे. ७ दिवसांच्या आत हे कुपन ग्राहकांना उघडावं लागेल. त्यानंतर यातील रक्कम ग्राहकांना कॅशबॅकच्या रूपात मिळेल.
३१ जानेवारीपर्यंत मोफत मिळणार LPG सिलिंडर; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:11 AM
पाहा कसा घेता येऊ शकेल या ऑफरचा लाभ?
ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंतच मिळणार याऑफरचा लाभकॅशबॅकच्या रूपात मिळू शकते संपूर्ण रक्कम