नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असताना आता एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ७३.५ रुपयांनी वाढ केली आहे. या महिन्यात केवळ व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरांमध्येच वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
घरगुती वापराच्या १४.२ किलोग्रामच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या सिलिंडरच्या किमतीत गेल्या महिन्यात २५.५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरचा दर मुंबईत ८३४.५० रुपयांवर पोहोचला. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५०.५० रुपये आहे.
१९ किलो व्यवसायिक सिलिंडरचे नवे दरमुंबईत ७२.५० रुपयांची वाढ झाल्यानं सिलिंडरचा दर १५७९.५० रुपयांवरदिल्लीत ७३ रुपयांच्या वाढीनं सिलिंडरचा दर १६२३ रुपयांवरकोलकात्यात ७२.५० रुपयांची वाढ; नवा दर १६२९ रुपयेचेन्नईत ७३.५० रुपयांची वाढ; नवा दर १७६१ रुपये