सध्या इन्स्टाग्रावर रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करतात. स्वत:चा जीव धोक्यातही घालतात, अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये रील बनवण्यासाठी धूर दाखवावा लागला, त्यासाठी एलपीजी गॅस रुममध्ये सोडला. यानंतर, रुममधील लाईट चालू केली. अचानक एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि एक पुरूष गंभीर भाजले. इमारतीचे नुकसान झाले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
उद्धवसेनेची कुंडली आज कोण मांडणार? उत्सुकता! निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंचे भाषण
मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील गोल का मंदिर रोडवरील द लेगसी नावाच्या सात मजली इमारतीत ही घटना घडली. येथे राहणारा अनिल जाट व त्यांची मेहुणी रंजना जाटसोबत फ्लॅटमध्ये रील बनवत होते. त्यांना रीलमध्ये धूर दाखवावा लागला, त्यासाठी खोलीत एलपीजी गॅस सोडला. रील शूट करण्यासाठी हॅलोजन लाईट चालू करताच खोलीत पसरलेल्या गॅसने अचानक पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला.
स्फोटानंतर फ्लॅटचे नुकसान झाले. स्फोट इतका जोरदार होता की फ्लॅटमधील लिफ्ट तुटली आणि आजूबाजूच्या फ्लॅटच्या भिंतींनाही नुकसान झाले. या अपघातात रील बनवणारे अनिल जाट आणि रंजना जाट हे भाजले. अपघातानंतरचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, यामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक स्वतःला वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाबाबत ग्वाल्हेरचे एसपी धरमवीर सिंह म्हणाले की, रील बनवण्याच्या प्रयत्नात एलपीजी गॅस सिलिंडर गळती झाला. इलेक्ट्रिक बोर्ड चालू होताच स्फोट झाला. या प्रकरणात रंजना आणि अनिल दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रीलसाठीच गॅस गळती केला
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोबाईल फोनवर असे व्हिडीओ आणि फोटो सापडले यामध्ये रंजना जाट सिलेंडरमधून गॅस गळती करताना दिसत आहेत. अनिल जाट तिथे व्हिडीओ बनवत होता. हे सर्व रील बनवण्यासाठी केले आहे. दोघांचाही निष्काळजीपणा समोर आला आहे.