शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

Lt General Manoj Pande : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख होणार; पहिल्यांदाच 'इंजिनीयर'ला मान मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 6:32 PM

Lt General Manoj Pande Set To Become Army Chief To Replace General MM Naravane विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे एप्रिल अखेरीस निवृत्त होणार

नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे Lt General Manoj Pande नवे लष्करप्रमुख असतील. विद्यमान लष्कर प्रमुख Army Chief  मनोज मुकुंद नरवणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांच्यानंतर लष्करात मनोज पांडे सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्कर प्रमुख पदाची सुत्रं नरवणे यांच्याकडून पांडे यांच्याकडे जातील. पांडे लष्करामध्ये इंजिनीयर विभागात कार्यरत आहेत. इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याला लष्करप्रमुख पदापर्यंत मजल मारता आलेली नाही. मात्र तो मान मनोज पांडेंना मिळणार आहे.जानेवारी २०२२ मध्ये मनोज पांडे यांची चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. नरवणे यांच्यानंतर लष्करात तेच सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्करप्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडेच सोपवली जाईल अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. डिसेंबर १९८२ मध्ये पांडे कोर ऑफ इंजिनीयर्समध्ये रुजू झाले. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. त्यांनी ३७ वर्षे लष्करात सेवा दिली आहे. ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रममध्ये त्यांचा सक्रीय सहभाग घेतला होता.लष्करात विविध विभाग आहेत. इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड, इंजिनीयर असे विविध विभाग लष्करात महत्त्वाची भूमिका बजावतात. या विभागांमधील वरिष्ठ अधिकारी पुढे लष्करप्रमुख होतात. इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत लष्करप्रमुख पद भूषवलं आहे. मात्र इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकही अधिकारी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचलेला आहे. मनोज पांडेंच्या रुपात पहिल्यांदाच इंजिनीयर विभागातील अधिकारी लष्करप्रमुख होईल.

मार्चच्या अखेरीस मोठे फेरबदलचालू वर्षात लष्करातून अनेक बडे अधिकारी निवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती, लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी ३१ जानेवारीला निवृत्त झाले. त्यानंतर मार्च अखेरीस लष्करात मोठे फेरबदल झाले. लेफ्टनंट जनरल एस. एस. महल यांनी शिमल्यात एआरटीआरएसीचं नेतृत्त्व हाती घेतलं. लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा यांनी लष्कराशी संबंधित एडजुटेंट जनरल पद हाती घेतलं. लेफ्टनंट जनरल जे. पी. मॅथ्यूज यांनी उत्तर भारत विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यभार स्वीकारला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान