नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ लखनऊ विमानतळावरच आंदोलनाला बसल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद मोदी असं त्यांचं नाव असून त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच त्यांनी थेट विमानतळाबाहेरच ठिय्या मांडला आहे. लखनऊ पोलिसांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रल्हाद मोदी यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. यासोबतच जर समर्थकांची सुटका केली नाही तर उपोषण करू असा धमकीवजा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
आमच्या स्वागतासाठी आलेल्या 100 कार्यकर्त्यांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे. "आमचा चार फेब्रुवारी रोजी सुल्तानपूर, पाच फेब्रुवारीला जौनपूर आणि सहा फेब्रुवारीला प्रतापगड येथे कार्यक्रम होता. मी आज यासाठी लखनऊ विमानतळावर पोहचलो पण येथे आल्यावर मला आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं असल्याचं समजलं. यामुळेच मी आता धरणे आंदोलन करत आहे. जोपर्यंत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सोडलं जात नाही तोपर्यंत मी असाच विमानतळावर आंदोलन करत राहणार" असं असा इशारा देखील प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?; मग जाणून घ्या फोन नंबर, पत्ता अन् बरंच काही...
लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी 24/7 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या या हेल्पलाईनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाईनवर फोन करताना अनेक जण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना भेटायचे आहे. तर काहींना सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेऊया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची सर्वात साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही मोदींच्या अधिकृत अकाउंटवरून तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट्स
www.facebook.com/narendramoditwitter.com/narendramodihttps://plus.google.com/+NarendraModi,https://www.youtube.com/user/narendramodihttps://www.instagram.com/narendramodihttps://www.mygov.in/home/61/discuss/
या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अॅप (नमो अॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.