शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Lucknow Encounter Case: पोलीस काका आम्हाला गोळी मारू नका, पोस्टर्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 10:09 AM

उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. लखनऊ, वाराणसीमधल्या अनेक गाड्यांवर विवेक तिवारी अमर रहे असे स्टिकर्स झळकले आहेत. तसेच सोशल मीडियावरही काही पोस्टर्स व्हायरल झाली आहेत. यात काही चिमुकलेही हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय.या पोस्टर्सवर लिहिलंय की, तुम्ही गाडी थांबवण्यास सांगितल्यास बाबा गाडी थांबवलीत, प्लीज गोळी मारू नका. या प्रकारानंतर लखनऊमधले नागरिक भीतीच्या दडपणाखाली आहेत. ज्या पद्धतीनं विवेकला गाडी न थांबवल्यामुळे गोळी घालण्यात आली, त्यामुळे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंतच्या मनात एका अनामिक भीतीनं घर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मृत विवेकच्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीत करून संवेदना व्यक्त केली आहे. तुमच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत करेन, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.  काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्याला लागली अन् विवेकचा मृत्यू झाला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश