बलरामपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं विजेचं बिल आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाने शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं बिल पाठवलं आहे. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार असं शेतकऱ्याचं नाव असून हे भलं मोठं बिल पाहून त्यांना धक्का बसला आहे. तसेच नोटीस मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय देखील चिंतेत आहे. डिसेंबर 2018 मध्ये या गावाचे विद्युतीकरण केले होते. गावातील शेतकरी शिवकुमार यांनी सौभाग्य योजने अंतर्गत पत्नी सुनीता देवीच्या नावावर विजेचं कनेक्शन घेतलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये सुनीता देवीच्या नावावर 1700 रुपयांचा विजेचं बिल आलं होतं. मात्र काही कारणास्तव शिवकुमार हे विजेचं बिल भरू शकले नाही.
29 जुलै 2020 मध्ये शिवकुमार यांच्या पत्नी सुनीता देवीच्या नावावर तब्बल 64,02,507 रकमेची नोटीस आली आहे. 8 ऑगस्टपर्यंत हे बिल जमा करण्याचे निर्देश त्यामध्ये देण्यात आले आहेत. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत आहे. आपली सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. घरात केवळ दोनच बल्ब सुरू असताना एवढं बिल कसं आलं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई