लखनौ : लखनौ विद्यापीठाने बुधवारच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त वर्ग बंद ठेवले असून पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या व व्हॅलेंटाइन डे साजरा करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात येऊ नये, असा सल्लावजा आदेश दिला आहे. महाशिवरात्रीनिमित्त विद्यापीठ बुधवारीही बंद राहील, असे विद्यापीठाने म्हटले आहे.विद्यापीठाचे शिस्तपालन अधिकारी विनोद सिंह यांनी सांगितले की, विद्यापीठ महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी बंद राहणार असून, कोणतेही जास्तीचे वर्ग, प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. पालकांनाही आवाहन आहे की, त्यांनी पाल्यांना विद्यापीठात पाठवू नये. विद्यापीठात भटकताना वा बसलेले आढळलेल्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.व्हॅलेंटाइन डे हा दिन ल्युपरकॅलिया नावाच्या रोमन सणापासून निर्माण झाला, असे म्हटले जाते. फौनुस नावाच्या रोमन देवासाठी हा दिवस सुगीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यात मुले एका खोक्यातून मुलींची नावे काढतात व त्या कालावधीत त्यांची जोडी बनते. या जोड्यांचे बहुतेक वेळा लग्न होते.प्रेमाचे प्रतीक गुलाबप्रेमाची रोमन देवता व्हीनसला लाल गुलाब आवडायचा म्हणून तेव्हापासून गुलाब हे प्रेमाचे प्रतीक बनले. १८ व्या शतकापर्यंत व्हॅलेंटाइनडेचा प्रचार झालेला नव्हता. नंतर मात्र प्रेमींनी एकमेकांना कार्डस, फुले किंवा छोटासा दागिना पाठवायला सुरवात केली.
व्हॅलेंटाइन डेवर घातली लखनौ विद्यापीठाने बंदी; परिसरात न येण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:49 PM