लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या शहरांचं नाव बदलणाऱ्या योगी सरकारनं आता राजधानी लखनऊमधील इकाना स्टेडियमचंही नाव बदललं आहे. इकाना या स्टेडियमचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्याला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोदी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे.योगी सरकारनं भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणा-या सामन्याच्या एका रात्री आधीच या स्टेडियमचं नाव बदललं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं इकाना स्टेडियमचं नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं आहे. आता इकाना स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या नावानं ओळखलं जाणार आहे.लखनऊमध्ये 24 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेटचा सामना होत आहे. लखनऊतल्या इकाना स्टेडियममध्ये 6 नोव्हेंबर रोजी इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. आता हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
योगी सरकारचा मोठा निर्णय, IND-WI सामन्याच्या एक रात्र आधीच बदललं स्टेडियमचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 9:54 PM