मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. नववर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज आहे. शुक्रवारी (10 जानेवारी) पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून, ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
याविषयी सोमण म्हणाले की, ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. शुक्रवार, 10 जानेवारी रोजी रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री 12.40 वाजता जास्तीत जास्त म्हणजे 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री 2.42 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल.
हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल, असेही सोमण यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण
गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक
हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
पंतप्रधान मोदी यांची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, बजेटची तयारी सुरू