भारत आणि शेजारील देशांमध्ये अनेक वेळा कोल्डवार सारखी स्थिती दिसून येते. चकमकीही होतात. मात्र आता भारतीय सीमेकडे तिरप्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तान आणि चीनला धडकी भरणार आहे. कारण आता M-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा (M-777 Ultra light Howitzer) भारतीय लष्करात समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचा खात्मा करण्याची या तोफांची क्षमता आहे.
या तोफा भारतीय लष्करात सामील झाल्याने, केवळ पाकिस्तानलाच नाही तर चीनलाही या तोफांचा सामना करणे अवघड असेल. कारण या तोफांमध्ये अशा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे या तोफांमधून निघणारे आगीचे गोळे शत्रूला अचूकपणे लक्ष्य करू शकतात. एवढेच नाही, तर बदलत्या लक्ष्यावरही मारा करू शकतात. या अत्याधुनिक तोफांची खासियत म्हणजे, यातून निघणाऱ्या गोळ्यांचा मार्ग रस्त्यातूनच बदलताही येऊ शकतो.भारतीय आर्मीची ताकद वाढणार - भारतीय लष्कराने या तोफा देशाच्या उत्तर आणि इशान्य सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तोफा सैन्य दलात सामील झाल्याने भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवर बारीक खोड्या काढत असतो आणि भारतीय लष्करही त्याला चोख प्रत्युत्तर देत असते. तर दुसरीकडे चीनचा अरुणाचल प्रदेशातील गावांवर डोळा आहे. अशा परिस्थितीत या तोफांचा भारतीय लष्करात सामील झाल्याने देशाची संरक्षण शक्ती वाढेल. या तोफांची रेंज 24 ते 40 किलोमीटरपर्यंत आहे. महत्वाचे म्हणज या तोफा कसल्याही प्रकारच्या हवामानात वापल्या जाऊ शकतात.