नवी दिल्ली - 16 वी लोकसभा विसर्जित करण्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. तर 17 व्या लोकसभा गठीत करण्याची तयारी सुरु झाली आहे. या दरम्यान एनडीए संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नियुक्ती होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे सात वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.
16 वी लोकसभा भंग करण्याबरोबर 17 व्या लोकसभेची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नवनिर्वाचित 542 खासदारांच्या नावाची यादी राष्ट्रपतींना सोपविण्यात आली. 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून पर्यंत संपणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा सादर केला होता. राष्ट्रपतींनी हा सामूहिक राजीनामा स्वीकारुन 16 वी लोकसभा भंग केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये त्यांच्या आईला भेटण्यासाठी जाणार आहेत. तर सोमवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांचे आभार व्यक्त करणार आहेत.
उद्या होणार का मन की बात?पुलवामा हल्ल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'मन की बात'मधून भेटू असं सांगितलं होतं. मी स्वत: निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे. निवडणुकीमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात 'मन की बात' कार्यरक्रमाचा एकही भाग प्रसिद्ध झाला नाही. आता 26 मे रोजी 'मन की बात'चा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मन की बात' कार्यक्रम नेहमी रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. त्याप्रमाणे मे महिन्यातील शेवटचा रविवार 26 तारखेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेला 'मन की बात'चा शेवटचा भाग प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.