संकटाचं संधीत रूपांतर करण्याची गोष्ट खूप प्रेरणादायी असते. कटिहारमध्ये एमए उत्तीर्ण झालेल्या चहावाल्या अजय कुमारची गोष्ट कोरोनाच्या काळापासून सुरू झाली आहे. एकेकाळी कोचिंग डायरेक्टर म्हणून करिअरला नवा आयाम देण्याचा विचार करणार्या अजयच्या आयुष्यात कोरोनाने नवे वळण आणले. कोरोनाच्या काळात कोचिंग इन्स्टिट्यूट ठप्प झाल्यानंतर तो इतर रोजगाराच्या शोधात होता.
कोरोनानंतर अजयने NH 31 डूमर पुलाजवळ एमए पास चहावाला नावाचा चहाचा स्टॉल सुरू केला. चांगल्या प्रतीचा चहा प्रामाणिकपणे विकून त्याने व्यवसायाला नवी ओळख दिली आहे. सध्या अजयचा चहा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. तसेच, NH 31 मार्गे प्रवास करणारे लोक अजयच्या चहाच्या स्टॉलचा थांबून चहा प्यायला विसरत नाहीत.
एमए पास अजय कुमार सांगतो की, त्याने अजूनही धीर सोडलेला नाही आणि तो अजूनही अनेक प्रकारच्या स्पर्धांसाठी तयारी करत आहे. आपली निवड होऊन पुढे प्राध्यापक म्हणून सेवा देतील, अशी आशा त्याने व्यक्त केली. अजयने सांगितलं की, आता काम चांगलं सुरू आहे.
दररोज 300-400 कप चहा विकतो. एका चहाची किंमत 10 रुपये आहे. यातून मला महिन्याला एक लाखापेक्षा जास्त नफा मिळतो. यावर तो सध्या समाधानी आहे. त्याचबरोबर या दुकानात अनेकदा चहा प्यायला येणारे ग्राहकही एमए पास चहावाल्याची कहाणी खूप प्रेरणादायी असल्याचे सांगतात. यातून तरुणांनी चांगल्या गोष्टी शिकाव्यात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.