मोदी सरकारच्या प्रयत्नांनी साधारण १०० वर्षाआधी वाराणसी येथून चोरी केली गेलेली देवी अन्नपूणाची मूर्ती ( Maa Annapurna Idol) कॅनडाहून भारतात परत आणली गेली आहे. ही मूर्ती ११ नोव्हेंबरला म्हणजे गुरूवारी उत्तर प्रदेश सरकारला सोपवली जाईल. या मूर्तीत देवी अन्नपूर्णाच्या एका हातात खिरीची वाटी आणि दुसऱ्या हाता चमचा आहे. असं मानलं जात आहे की, १८व्या शतकातील ही मूर्ती १९१३ मध्ये काशीतील एका घाटावरून चोर गेली होती. त्यानंतर ती कॅनडाला नेण्यात आली होती.
पुन्हा काशीत स्थापन करणार मूर्ती
मीडिया रिपोर्टनुसार, आई अन्नपूर्णेची ही मूर्ती कॅनडातील एका विश्वविद्यालयात ठेवली होती. ही मूर्ती परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होतं. आई अन्नपूर्णेची ही प्राचीन मूर्ती १५ नोव्हेंबरला काशी विश्वनाथ धामममध्ये पुन्हा स्थापन केली जाणार आहे. त्याआधी ४ दिवस ही मूर्ती १८ जिल्ह्यात दर्शनासाठी ठेवली जाईल.
१०० वर्षापासून कॅनडात होती
गेल्यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये ही मूर्ती भारतात परत आणण्याबाबत माहिती दिली होती. गेल्या १०० वर्षापासून ही मूर्ती यूनिव्हर्सिटी ऑफ रेजिनाच्या मॅकेंजी आर्ट गॅलरीत होती. हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा या गॅलरीत एक प्रदर्शनी सुरू होती. तेव्हा कलाकार दिव्या मेहराची नजर या मूर्तीवर पडली. त्यांनी हा मुद्दा उचलला आणि मग सरकारने ही मूर्ती परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले.