शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

भारीच! हवेतील कोरोनाचा शोध घेणारी आणि खात्मा करणारी मशीन्स तयार; जाणून घ्या कसं करणार अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 4:03 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,07,95,716 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,766  नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,206 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,07,145 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. तुमच्या आजूबाजूच्या हवेत कोरोना आहे की नाही, हेसुद्धा समजणार आहे. इतकंच नाही तर व्हायरसचा खात्माही आता करता येणार आहे, अशी दोन उपकरणं (Coronavirus detecting devices) भारतीय तज्ज्ञांनी विकसित केली आहेत.

केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेच्या (CSIO) चंडीगड येथील लॅबने एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना व्हायरस (Corona Virus) आहेत का हे तपासण्यासाठी तसेच या व्हायरसला नष्ट करण्यासाठी अशी दोन नवीन उपकरणं (Device) विकसित केली आहेत. यापैकी एक एअर सॅम्पलर (Air Sampler) असून दुसऱ्या उपकरणाचं नाव एअर प्युरिफायर (Air Purifier) असं आहे. हे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित आहे. ही उपकरणं घर, शाळा, ऑफिसेस, मॉल आणि मोठ्या हॉलमध्ये बसवता येऊ शकतात. हवेत कोरोना व्हायरस अस्तित्वात आहे की नाही, याची तपासणी करणाऱ्या उपकरणाचं नाव एअर सॅम्पलर असं आहे. 

एअर सॅम्पलर या छोट्याशा उपकरणात एअर कॉम्प्रेसर बसवण्यात आला आहे. हा कॉम्प्रेसर (Compressor) हवा आत खेचतो. त्याच्या आतल्या बाजूला एक मेम्ब्रेन आहे.  वीज आणि बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. हे उपकरण बाजारात आणण्यासाठी सीएसआयआरने 5 कंपन्यांसोबत भागीदारीही केली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) निर्देशक जितेंद्र जे. जाधव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, एअर सॅम्पलर जाळीच्या माध्यमातून हवा आत खेचून घेतो. यातल्या मेंम्ब्रेनवर हवेतून येणारे सूक्ष्मकण चिटकतात. मेम्ब्रेनवर सूक्ष्म कणांमध्ये व्हायरसचा समावेश नाही हे संध्याकाळी लॅबमध्ये जाऊन तपासणं आवश्यक आहे. त्यात व्हायरस आढळून आला, तर हे उपकरण ज्या ठिकाणी लावलं होतं, तेथील लोकांना अलर्ट करणं सोपं जाणार आहे.

विकसित करण्यात आलेलं दुसरं तंत्र आहे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित एअर प्युरिफायर. यामध्ये बसवण्यात आलेल्या अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पमध्ये बसवण्यात आलेली ट्यूब व्हायरसना नष्ट करते. एअर प्युरिफायर हा बंदिस्त खोलीत एसी हवा खेळती ठेवतो. डक्टिंग सिस्टीममध्ये जेव्हा हवा परत जाते तेव्हा यूव्ही लाइटच्या (UV Light) माध्यमातून एअर प्युरिफायर हवा पूर्णतः स्वच्छ करतो. यामुळे खोलीत विषाणू न जाता केवळ शुद्ध हवा पोहोचते. हे उपकरण सध्या रेल्वेतले काही कोच, एसी बस, ऑडिटोरियम, सीएसआयआरच्या काही कार्यालयांमध्ये बसवता येऊ शकतात. याची किंमत ठिकाणानुसार 3 हजारांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत असेल. ही उपकरणं येत्या काळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यंत प्रभावी ठरू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान