भिकाऱ्यासारखे बनवून टाकलेय...; उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:25 PM2021-12-24T22:25:51+5:302021-12-24T22:26:10+5:30
कॅबिनेटच्या बैठकीत हरक सिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे. हरक सिंह रावत हे कोटद्वारमधील मेडिकल कॉलेजची मागणी करत होते.
उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या सरकारवर मोठे आरोप लावले आहेत. राज्य सरकार कोटद्वारमध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी देत नाहीय. आपली मागणी तशीच लटवकून ठेवली आहे. अशा परिस्थितीत सरकारमध्ये काम करू शकत नाही, असे म्हणत हरक यांनी कॅबिनेटच्या बैठकीतच राजीनामा दिला आहे.
हरक सिंह रावत हे कोटद्वारमधील मेडिकल कॉलेजची मागणी करत आहेत. त्यांनी अनेकदा सरकारच्या समोर हा मुद्दा अनेकदा उचलला आहे. मात्र, त्यांनी ही मागणी पूर्ण केली नाही. अशातच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हरक सिंह रावत हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यावर काही माहिती हाती आलेली नाही, परंतू तशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
गेल्या 5 वर्षांपासून मी मेडिकल कॉलेजची मागणी करत आहे. मात्र, या लोकांना मला भिकाऱ्यासारखे बनवून टाकले आहे, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्या सरकारने ही मागणी ऐकली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.