१०० दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले -- भाग १
By admin | Published: February 10, 2015 12:55 AM
युती सरकार क्रियाशील : भाजप नेत्यांचा दावानागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही अशाच वेगाने सरकार निर्णय घेईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. युती सरकारने १०० दिवसात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार ...
युती सरकार क्रियाशील : भाजप नेत्यांचा दावानागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही अशाच वेगाने सरकार निर्णय घेईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. युती सरकारने १०० दिवसात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेची धुरा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सांभाळली असली तरी महापौर, जि.प. अध्यक्ष यांच्यासह जवळपास सर्वच आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस दररोज १६ तास काम करतात. सर्व मंत्रीही पूर्णवेळ काम करीत आहेत. कुठल्याही सरकारचे मूल्यमापन करण्यासाठी १०० दिवसांचा कालावधी हा अत्यल्प आहे. मात्र, या कमी काळातही युती सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. सध्या ४० हजार गावांपैकी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. सरकारने राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले आहेत. डावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मान मुख्यमंत्र्यांना मिळाला. यातून उद्योग व कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे सर्व विकास आराखड्यांना तातडीने मंजुरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महानगरांच्या विकासासाठी विकास समिती स्थापन केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, रमेश मानकर, प्रकाश टेकाडे, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.