19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:48 AM2020-08-22T10:48:53+5:302020-08-22T11:00:51+5:30

WhatsApp वरून एका पतीने पत्नीला तलाक दिला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

madhya prades husband said talaq talaq talakq on whatsapp call case filed | 19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

Next

भोपाळ  - तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू झाला असला तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशात अशीच एक घटना उघडकीस आली. अवघ्या काही सेकंदात 19 वर्षांचं नातं तुटल्याची घटना घडली आहे. WhatsApp वरून एका पतीने पत्नीला तलाक दिला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. महिलेला दोन मुलं असल्याची माहिती मिळत आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलेला न्याय देण्याचं आश्वासन देत कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. गेल्या काही वर्षांपासून तो पत्नीला त्रास देत होता. सतत पैशाची मागणी करत होता. त्यानंतर त्याने आता WhatsApp वरून पत्नीला तलाक दिला आहे. 

महिलेने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 'माझ्या या बहिणीला न्याय मिळवून देणार, महिलांच्या आयुष्याशी कोणीही खेळू शकत नाही. दोषींच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत असं ट्विटही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"

Video: 'एक साथ नमस्ते'; भारतीय संस्कृतीतील संस्कार असलेल्या 'नमस्कारा'ची जादू सातासमुद्रापार

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! ...म्हणून हा चहावाला करतो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार

विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...

Ganesh Chaturthi : गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात?... अंक'शास्त्रा'मागे आहे अनलासुराच्या वधाची आख्यायिका

Web Title: madhya prades husband said talaq talaq talakq on whatsapp call case filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.