धक्कादायक! जमिनीचा वाद, दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 09:20 AM2024-07-22T09:20:32+5:302024-07-22T09:26:42+5:30

मध्य प्रदेशातील रीवा येथे दोन महिलांना जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

madhya pradesh 2 women partially buried in murrum during protest against Road construction in rewa three booked and video viral | धक्कादायक! जमिनीचा वाद, दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! जमिनीचा वाद, दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

शेतजमिनीचे वाद आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतात, अनेक ठिकाणी जमिनीसाठी हत्येसारखी प्रकरण समोर आली आहेत. मध्य प्रदेशातून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे दोन महिलांना जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून एका आरोपीला अटक केली आहे.

RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

मध्य प्रदेशातील रेवा येथे एका रस्त्याचे काम सुरू आहे.या रस्त्याच्या कामाला विरोध सुरू आहे. विरोध करणाऱ्या दोन महिलांवर ट्रकमधून खडी टाकल्याने ते अर्धवट गाडले. ही घटना मंगवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिनोटा जोरोट गावात शनिवारी घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण सांगितले आहे. या घटनेचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक लाल यांनी सांगितले की, ममता पांडे आणि आशा पांडे नावाच्या महिला रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या आणि त्या खड्याखाली अर्धवट गाडल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.

एडीजी जयदीप प्रसाद यांनी सांगितले की, कुटुंबातील वादातून ही घटना घडली आहे. तक्रारदार आशा पांडे यांनी सांगितले की, हा वाद त्यांचे नातेवाईक गोकरण पांडे यांच्या संयुक्त मालकीच्या जमिनीच्या तुकड्याशी संबंधित होता आणि त्या जमिनीवर रस्ता बनवला जात असताना त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकासह त्याला विरोध केला.

आशा पांडे यांनी पोलिसांना सांगितले की, ट्रक चालकाने त्यांच्यावर खडी फेकली आणि नंतर गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले.

पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

काँग्रेसची टीका

या घटनेनंतर मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला, तर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेला त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन आरोपींपैकी एकाला अटक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यादव यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, "रीवा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे माझ्या निदर्शनास आले, यामध्ये मी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: madhya pradesh 2 women partially buried in murrum during protest against Road construction in rewa three booked and video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.