मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार; 28 मंत्र्यांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:26 PM2018-12-25T17:26:32+5:302018-12-25T17:27:21+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात 28 आमदारांना स्थान मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलासह अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळाले आहे. गेल्या 11 डिसेंबरला मध्यप्रदेशात विधानसभेसाठी निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करत विजय मिळवला होता. यानंतर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी 17 डिसेंबरला मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून कमलनाथ यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु होता.
Madhya Pradesh: Jaivardhan Singh, son of Digvijaya Singh takes oath as minister in Bhopal. pic.twitter.com/R9jz5BiQiQ
— ANI (@ANI) December 25, 2018
कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री...
डॉ. गोविंद सिंह, आरिफ अकील, बृजेंद्र सिंह राठोड, सज्जन सिंह वर्मा, बाला बच्चन, लाखन सिंह यादव, विजय लक्ष्मी साधो, हुकुम सिंह कराड़ा, तुलसी सिलावट, गोविंद राजपूत, ओमकार सिंह मरकाम, सुखदेव पांसे, प्रभुराम चौधरी, जयवर्धन सिंह, हर्ष यादव, कमलेश्वर पटेल, लखन घनघोरिया, तरुण भनोट, पी सी शर्मा, सचिन यादव, सुरेंद्र सिंह बघेल, जीतू पटवारी, उमंग सिंगार, प्रद्युम्न सिंह तोमर, प्रदीप जायसवाल, महेंद्र सिंह सिसौदिया, इमरती देवी आणि प्रियव्रत सिंह यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.
Madhya Pradesh: Vijayalaxmi Sadho, Sajjan Singh Verma and Hukum Singh Karada take oath as ministers in Bhopal. pic.twitter.com/nrSYa4cYBk
— ANI (@ANI) December 25, 2018