खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:01 PM2020-11-05T12:01:17+5:302020-11-05T12:03:52+5:30

3 Year Old Child Falls in Borewell : चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

madhya pradesh 3 year old falls in borewell army undertakes rescue | खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Next

निवारी - मध्य प्रदेशच्या निवारी या तालुक्यात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच सेनेचीही मदत घेण्यात आली आहे. चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. खेळता खेळता तीन वर्षांचा हा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळत आहे. सहायक पोलीस अधीक्षक प्रतिभा त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसारस हा चिमुकला निवारीतील सेतपुरा गावचा रहिवासी आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील चिमुकल्यासाठी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. "ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झाली आहे. लवकरच प्रल्हादला सुखरुप बाहेर काढण्यात येईल, असा मला विश्वास आहे" असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

"ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू" असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. प्रल्हाद कुशवाहा असं या तीन वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज सुरुवातीला येत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मुलाला बोअरवेलमधून सुखरुपरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी प्रशासनाच्या सर्व टीम्स वेगाने कार्य करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: madhya pradesh 3 year old falls in borewell army undertakes rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.