Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 16:09 IST2022-01-02T15:09:05+5:302022-01-02T16:09:30+5:30
Girl bitten by dogs: या घटनेची दखल घेत मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे.

Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल
भोपाळ:मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रस्त्यावरील आवारा कुत्र्यांनी एका 4 वर्षीय चिमुकलीच्या अंगाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील बागसेवानिया येथील अंजली विहार फेज-2 मध्ये ही घटना घडली. ही घटना शनिवारी घडली असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील भोपाळमधील कपर्ड कॅम्पसमधील एका इमारतीत मजूर म्हणून काम करतात. या इमारतीजवळ मुलगी खेळत होती. यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला केला. तिच्या अंगाचे लचके या कुत्र्यांनी तोडले. त्या कुत्र्यांच्या हल्ल्यासमोर चिमुकली काहीच करू शकली नाही. काही सेकंदानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने कुत्र्यांना दगड मारुन हकलले. सुदैवाने या हल्ल्यात चिमुकलीचा जीव वाचला, पण तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या दात आणि नखांच्या खोल जखमा झाल्या आहेत.
पाहा व्हिडिओ:-
4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडल लचके, भोपाळमधील धक्कादायक घटना#dogsattackpic.twitter.com/LYDudQyTmk
— Lokmat (@lokmat) January 2, 2022
मानवाधिकार आयोगाने घेतली दखल
या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या या जखमी मुलीवर हमीदीया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे. आयोगाच्या वतीने, महापालिका आणि आयुक्त भोपाळ यांना या मुद्यांवर तपशीलवार माहिती देण्यास सांगितले आहे.
लाखो रुपये खर्चूनही परिस्थिती जैसैथे
भोपाळच्या बहुतांश भागात भटक्या कुत्र्यांची भीती आहे. भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी भोपाळ महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. पण, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या भयानक व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ समोर येताच भोपाल महानगरपालिकेचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.